हृतिकचा “सुपर 30′ जुलैपर्यंत पुढे ढकलला

हृतिक रोशनचा “सुपर 30′ 26 जुलैला रिलीज होणार आहे. स्वतः हृतिकने ट्‌विटरवर ही माहिती दिली आहे. मात्र ही वेळ आता लवकरच बदलली जाईल, असेही हृतिकने म्हटले आहे. या सिनेमाच्या रिलीजसाठी आतापर्यंत अनेकवेळा तारखा जाहीर झाल्या आहेत आणि त्यात बदलही झाले आहेत. यापूर्वी 25 जानेवारीला “ठाकरे’आणि कंगणा रणावतच्या “मणिकर्णिका-क्वीन ऑफ झांसी’ बरोबर रिलीज होणार असे जाहीर झाले होते.

मात्र ठाकरेबरोबर “मणिकर्णिका’ आता रिलीज होणार नाही. याशिवाय इम्रान हाश्‍मीचा “व्हाय चीट इंडिया’ही पुढे ढकलला गेला. गेल्या ऑक्‍टोबरमध्ये डायरेक्‍टर विकास बहलवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. त्यानंतर हृतिक रोशनने बहलबरोबरच्या कामास नकार देऊन सिनेमातून माघार घेण्याची घोषणा केली. विकास बहलविरोधात निर्मात्यांनी कठोर कारवाई करावी, अशी विनंतीही त्याने केली होती. विकास बहलने आपल्यावरील आरोप मात्र नाकारले होते. या सर्व घडामोडींमुळे “सुपर 30′ च्या पोस्ट प्रॉडक्‍शनला उशीर होत गेला आणि आता अखेर सिनेमा 26 जुलैमध्ये रिलीज्‌ करण्याचे ठरले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)