अशाप्रकारे करा ‘शाॅर्ट यूआरएल’ (URL)

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञान म्हटले की इंटरनेट आवश्यक आहे. जगात कुठेही इंटरनेटशिवाय आजकाल कोणतेही काम होणे शक्य नाही. अनेक कंपन्या, बँक, महाविद्यालये, दवाखाने, सरकारी कार्यालये, वृत्तपत्रे यांच्या वेबसाईट असतात. या वेबसाईट संबंंधित लोक आपल्या गरजेनुसार कामानिमित्त त्या वेबसाईटला भेट देत असतात. या वेबसाईटवरील ठरावीक पेजवरील माहिती आपण लिंक किंवा यूआरल व्दारे शेअर करतो. त्यामुळे या लिंकस किंवा यूआरल या वेबसाईटकरिता महत्वाच्या असतात.

यूआरएल म्हणजे काय ?

एखादी वेबसाइट सुरुवातीपासून न पाहता आपणास एक मोठी लिंक पाठविली जाते तर त्या लिंकला लिंक ऐवजी युआरएल (url) असे म्हणतात. युआरएल (url) चे पूर्ण नाव Uniform Resource Locator म्हणजेच एखाद्या पानाचा विशिष्ट स्त्रोत. युआरएल (url) ही प्रामुख्याने एखाद्या वेबसाइटच्या एका विशिष्ट पानावर जाण्याचा प्रत्यक्ष मार्ग होय.

उदा. वृत्तपत्राची साईट आहे. त्याठिकाणी महत्वाची बातमी असते. मग ती बातमी एखादा व्यक्ती यूआरल म्हणजे बातमीची लिंक सोशल मीडियावर शेअर करतो. अनेकवेळा या यूआरएल इतक्या मोठ्या असतात कि पाहूनच काही जण त्या अोपन करत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी ती महत्वाच्या बातमीची लिंक पाठवूनही उपयोग होत नाही. त्यासाठी अनेकवेळा मोठ्या यूआरएल या शाॅर्ट करून पाठवल्या जातात.

पण अनेक जणांना यूआरल शाॅर्ट कशा करायचे हेच माहित नसते. अशाच काही आॅनलाईन वेबसाईट आहेत त्या वापरून आपण यूआरएल शाॅर्ट करू शकतो. बिटली यूआरएल शाॅर्टनर, गूगल यूआरएल शाॅर्टनर, टिनीयूआरएल शाॅर्टनर ही त्यापैकी काही अॅप्सची नावे आहेत.

गूगल यूआरएल शाॅर्टनर

1. सर्वप्रथम ब्राउजर मध्ये गूगल यूआरएल शाॅर्टनर टाईप करा त्यानंतर यूआरएल शाॅर्टनरची विंन्डो येईल.2. या विंन्डोवर ‘यूअर अोरिजिनल यूआरएल’ या टेक्सट बाॅक्स मध्ये तुमची मोठी यूआरएल म्हणजेच तुम्हाला जी हवी ती यूआरएल टाका.
3. त्यानंतर ‘शाॅर्टनर यूआरएल’ या पर्यायावर क्लिक करा.
4. त्यांनतर एक विन्डों अोपन होईल तिथे तुमची अोरिजिनल मोठी यूआरएल ही शाॅर्ट झालेली दिसेल.


5. ‘काॅपी शाॅर्ट यूआरएल’ या आॅयकाॅन वर क्लिक करून शाॅर्ट यूअारएल काॅपी करून ती तुम्ही इतरांशी शेअर करू शकता.

‘गूगल यूआरएल शाॅर्टनर’ ही गूगलची आॅफिशिअल यूआरएल शाॅर्टनर आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही कोणतीही यूआरएल शाॅर्ट करू शकता. यामध्ये तुम्ही प्रत्येक दिवसाचा, आठवड्याचा आणि महिन्याचा डेटा सुध्दा पाहू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे लिंक शाॅर्ट करताना तुमचं जीमेल अकाउंट हे लाॅगइन केलेलं असलं पाहिजे. त्याशिवाय ‘गूगल यूआरएल शाॅर्टनर’ ची विंन्डो तुम्हाला प्राप्त होणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)