अशाप्रकारे फेसबुक अकाउंटवर दुसऱ्या अॅप्सची देखरेख होईल बंद

जगभरात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या कोटीच्या घरात आहे. प्रत्येक यूजर्सला ही चिंता असते की, कोणी अन्य व्यक्ती किंवा एखादे अॅप तुमच्या फेसबुक प्रोफाइलचा गैरवापर तर करत नाही ना ? जर तुम्ही पण त्यापैकी एक आहात तर आज आम्ही तुम्हाला स्वत:च्या फेसबुक प्रोफाइल वर इतर दुसऱ्या अॅपची एन्ट्री कशी बंद करायची, हे सांगणार आहोत.

सोशल मीडियावरील प्रसिध्द व सर्वात जास्त वापर असणाऱ्या ‘फेसबुक‘वर कोण-कोणते अॅप्लीकेशन तुमची माहिती (डेटा) वापरत आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर सर्वात आधी ‘ब्राउजर‘ किंवा ‘अॅप‘वरून ‘फेसबुक अकाउंट‘ अोपन करा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर फेसबुकमधील ‘सेटिंग‘ या पर्यायाची निवड करा. जर तुम्ही फोनवरून अकाउंट अोपन करत असाल तर स्क्रीनच्या वरच्या बाजूला उजव्या साइडवरील ‘तीन रेषा‘ असलेल्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर खालच्या साइडला फोनमध्ये ‘अॅप्स अॅण्ड वेबसाइट‘ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

त्यानंतर एक नवीन स्क्रीन अोपन होईल. त्या स्क्रीनवर सर्वात वरती ‘लाॅन इन विथ फेसबुक‘ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर नवीन विन्डों अोपन होईल त्यामध्ये तुम्हाला अॅक्टिव्ह या पर्यायामध्ये ‘अॅप्सची लिस्ट‘ दिसेल.  ही अॅप्सची लिस्ट म्हणजेच जे ‘अॅप्स’ तुमची फेसबुक प्रोफाइल अॅक्सेस करत आहेत असे अॅप्स होय.

यानंतर तुम्हाला जर हे अॅप्स किंवा सेवा काढून टाकायच्या असतील तर त्यासाठी समोरील बाॅक्स वर क्लिक करा. असे केल्याने अॅप्सच्या लिस्टच्या  वर ‘रिमूव्ह‘ नावाचा पर्याय अॅक्टिव्हेट होईल आणि त्या पर्यायाचा रंग पण बदलेल. त्यानंतर ‘रिमूव्ह’ नावाच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर संंबंधित अॅप तुमची फेसबुक प्रोफाइल अॅक्सेस करू शकणार नाही आणि अशा अॅप्सची तुमच्या प्रोफाइलवरील एन्ट्री बंद होईल.

याव्यक्तिरिक्त ‘जे अॅप्स तुमची प्रोफाइल अॅक्सेस करत आहे किंवा जे अॅप्स प्रोफाइल अॅक्सेस करत होते पण आता त्यांना रिमूव्ह करण्यात आले आहे’ अशाप्रकराची लिस्ट यूजर्स वरील बाजूस ‘एक्सपायर्ड‘ आणि ‘रिमूव्ह’ या पर्यायामध्ये पाहू शकतील.

-स्वप्नील हजारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)