प्रत्येक घोटाळयात एकाच कुटुंबाचे नाव कसे? : मुख्यमंत्र्यांचा कॉंग्रेसला सवाल

मुंबई: बोफोर्स असो… पाणबुडी असो… किंवा आताचा ऑगस्ता वेस्टलॅंड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा असो… प्रत्येक घोटाळयात एकाच कुटुंबाचे नाव कसे येते? असा रोखठोक सवाल करत आता जे पुरावे समोर आले आहेत, त्यावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच कॉग्रेसने उत्तर द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर ऑगस्ता वेस्टलॅण्ड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी ब्रिटीश दलाल ख्रिश्‍चन मिशेल याच्या चौकशीतून कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव समोर आल्यानंतर आता देशातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. कॉंग्रेसकडून माजी पक्षाध्यक्षांची पाठराखण केली जात असल्याने सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. ऑगस्ता वेस्टलॅंड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीत एकूण 225 कोटी रूपयांची लाच देण्यात आली आहे. या व्यवहारातील मध्यस्थ ख्रिश्‍चियन मिशेल याच्या भारतात प्रत्यार्पणानंतर सर्व गोष्टी उघड होत आहेत. या प्रकरणातील भ्रष्टाचार न्यायालयात उघड झाल्याशिवाय राहणार नसल्याचेही ते म्हणाले.

मिशेलला जेव्हा भारतात आणले तेव्हा कॉंग्रेसनेच आपला एक नेता त्याला वकिल म्हणून दिला होता. याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. मिशेलला भेटायला जेव्हा त्याचा वकिल गेला तेव्हा त्याने सोनिया गांधी यांच्याबद्दल जर मला प्रश्न विचारले तर काय उत्तरे द्यायची अशी विचारणा करणारी एक चिठ्ठीही त्या वकिलाला दिली. या हेलिकॉप्टरच्या सौद्याची फाईल संरक्षण विभागात जेव्हा एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जायची, तेव्हा प्रत्येक हालचालीची एक कॉपी मिशेल आणि हॅश्‍के या व्यक्‍तींकडे जायची, देशाच्या संरक्षणासाठी हा एक धोका आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात परदेशी संस्थांनी केलेल्या तपासात, न्यायालयांच्या निर्णयात ही नावे उघड झाली आहेत. मध्यस्थ ख्रिश्‍चियन मिशेल याच्या चौकशीत अनेक धक्‍कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. या कागदपत्रांत सोनिया गांधी, एका इटालियन महिलेचा मुलगा जो पंतप्रधान होउ शकतो असा “आर’,’एपी’ असे संदर्भ पुढे आले आहेत. त्यामुळे कालपर्यंत चोर-चोर म्हणून ओरडणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी आता या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

कॉंग्रेसला या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखा वकिल लाभला आहे. पण पवारसाहेबही जाणून आहेत की या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे. पण पवारसाहेबांना कॉंग्रेसची वकिली करण्यावाचून पर्याय नसल्याचा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)