फ्री वाय-फाय (Wi-Fi) कसं शोधाल…

सध्याचे जग हे इंटरनेटचे आहे. इंटरनेटमुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीविषयी, कोठेही आणि केव्हाही माहिती मिळवणे शक्‍य झाले आहे. इंटरनेट वापरासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात. तस पाहता सध्या इंटरनेट पॅकच्या किंमती फार नाहीत, पण जर एखादी गोष्ट फ्री मिळत असेल तर ती घेणे कोणाला आवडणार नाही.

रेल्वे स्टेशन सारख्या अनेक सार्वजनिक ठिकाणी फ्री वाय-फाय उपलब्ध असते, पण नेहमीच आपण त्याठिकाणी असो हे सांगता येत नाही. अनेकवेळा महत्वाच्या कामासाठी आपल्याला इंटरनेटची खूपच आवश्‍यकता निर्माण होते. रेंजच्या कारणामुळे इंटरनेट असूनही उपयोग होत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशावेळी तुम्हाला इंटरनेट म्हणजेच वाय-फाय ते ही फ्रीमध्ये मिळाले तर… अशाच तीन टिप्स तुम्हाला आम्ही सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही फ्री वाय-फाय मिळवू शकाल.

1) वेफी (Wefi) – वेफी हे असे अॅप आहे ज्याच्या मदतीने तुमच्या आसपासच्या परिसरातील उपलब्ध वाय-फाय बदलची माहिती मिळते. या अॅपची खासियत म्हणजे जर हे अॅप तुमच्या मोबाइलमध्ये असेल तर तुमचा मोबाइल ऑटोमॅटीक फ्री वाय-फायशी कनेक्‍ट होईल, यासाठी तुम्हाला फ्री वाय-फाय शोधण्याची गरज नाही. हे अॅप तुम्ही प्लेस्टोरमधून फ्री मध्ये डाउनलोड करू शकता.

2) फेसबुक (Facebook) – तुम्ही तुमच्या फेसबुक अॅपव्दारे सुध्दा फ्री वाय-फाय शोधू शकता. फेसबुक अॅपव्दारे लॉगइन केल्यानंतर फेसबुक अॅपच्या उजव्या साइडला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्‍लिक करावे लागेल. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यावर फाइंड वायफाय (Find Wi-Fi) असा ऑप्शन येईल. त्यावर क्‍लिक केल्यास तुम्हाला फ्री वायवायची पूर्ण लिस्ट दिसेल.

3) इन्स्टाब्रीज (Instabridge) – हे पण एक असे अॅप आहे ज्याच्या मदतीने तुम्ही पब्लिक वायफायशी कनेक्‍ट होऊ शकता. या अॅपची खासियत म्हणजे हे अॅप सर्वात फास्ट नेटवर्कशी कनेक्‍ट करते. याशिवाय जर नेटवर्क नाही मिळाले तर हे अॅप ऑटो मोबाइल नेटवर्कवर येते त्यामुळे तुमच्या उपकरणाची इंटरनेटशी कनेक्‍टिविटी कायम राहते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)