अॅडल्ट साईट ब्लॉक कशी करावी?

इंटरनेटच्या मायाजालात सर्व जग खुले झाले आहे. जगातील कानाकोपऱ्यातील गोष्टी घरबसल्या पाहावयास मिळत आहेत. माहिती क्रांतीचा हा सकारात्मक परिणाम असला तरी काही वाईट गोष्टीही त्यासोबत आल्या आहेत. अॅडल्ट म्हणजेच केवळ प्रौढांसाठीचे संकेतस्थळ लहान मुलेही बिनदिक्कत पाहताना दिसून येत आहेत. इंटरनेटचा हा दुरपयोग लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम करणारा ठरत आहे. लॅपटॉप, पीसी किंवा मोबाइलमध्ये अशा प्रकारच्या साईट सहजपणे सुरू होऊ शकतात. त्यामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत. नको त्या गोष्टी नको त्या वयात मुलांच्या नजरेस आल्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, या भीतीने पालकांना सध्या ग्रासले आहे. म्हणूनच घरातील पीसी किंवा लॅपटॉपमध्ये अॅडल्ट साइट ब्लॉक करू इच्छित असाल किंवा पीसीमध्ये काही प्रायव्हसी सेटिंग करू इच्छित असाल तर या ठिकाणी काही टिप्सच्या मदतीने या साईट बंद करता येतील. या मदतीने आपण मुलांपासून प्रायव्हसी राखू शकतो. विंडो सेव्हन आणि विंडो 8 मध्ये अनेक ब्राऊजर एक्‍स्टेशन दिले आहेत. त्या मदतीने आपण पीसीत अॅडल्ट साईट सहजपणे ब्लॉक करू शकता. पीसीमध्ये अशा प्रकारची साईट ओपन करत असाल तर त्या साईटचा केवळ मुलांवर दुष्परिणाम होत नाही तर त्यात अनेक बग असू शकतात, की जे पीसीमध्ये सेव्ह असलेला महत्त्वाचा डेटा डिलिट करू शकतात. जसे की बॅंकेशी निगडित माहिती किंवा मेलमध्ये असलेला डेटा लिक होऊ शकतो.

विंडोज 8 मध्ये कृती करताना
सर्वात अगोदर आपण विंडो एट अॅडमिनिस्ट्रेटर अकाऊंटमध्ये लॉगइन करा.
त्यानंतर कंट्रोल पॅनेलमध्ये जाऊन नेटवर्क अॅण्ड इंटरनेटचा पर्याय निवडा.
नेटवर्क अॅण्ड इंटरनेटमध्ये गेल्यानंतर इंटरनेट ऑप्शन्सवर सिलेक्‍ट करा, तेथे आपल्याला इंटरनेट प्रॉपर्टी विंडो दिसेल.
या विंडोमध्ये कंटेन्ट टॅबचा ऑप्शन निवडा.
टॅप ऑप्शनमध्ये आपल्याला फॅमिली सेफ्टी ऑप्शन दिसेल. फॅमिली सेफ्टीवर क्‍लिक करा.
अकाऊंट निवडल्यानंतर फॅमिली सेफ्टी ऑप्शन ऑन करा आणि नंतर वेब फिल्टरिंग ऑप्शनची निवड करा.
वेब फिल्टरिंगच्या पर्यायात गेल्यानंतर कॅन ओन्ली यूज द वेबसाईट आय अलाऊ ऑप्शनची निवड करा.
यानंतर आपण रिस्ट्रिक्‍शन लेव्हलला सेट करा. यानुसार सेट केल्यानंतर बहुतांश अॅडल्ट साईट ब्लॉक होईल. अर्थात आपण जर काही निवडक साईट ब्लॉक करु इच्छित असाल तर त्याचा यूआरएल मॅन्यूअली टाकून त्याला ब्लॉक करू शकता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– विधिषा देशपांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)