एनआरआय मतदार किती?

सतराव्या लोकसभा निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या नव्या मतदार यादीनुसार देशात मतदारांची संख्या 89.87 कोटींवर पाहोचली आहे. यामध्ये 71,735 एनआरआय म्हणजेच अनिवासी भारतीय मतदारांचा समावेश असणार आहे. हा आकडा देशातील नोंदणीकृत मतदारांच्या संख्येच्या एक टक्‍केही नाही. या एनआरआय मतदारांमध्ये सर्वाधिक म्हणजे 92 टक्‍के मतदार केरळमधील आहेत. या राज्यातील नोंदणीकृत एनआरआय मतदारांची संख्या 66,584 इतकी आहे; तर 5151 उमेदवार अन्य राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. आंध्र प्रदेशातील एनआरआय मतदारांची संख्या 2511 इतकी आहे. तर तेलंगणामध्ये हा आकडा 1127 आहे. याखेरीज अन्य दोन राज्यांत 1000 हून अधिक एनआरआय मतदार आहेत.

वास्तविक पाहता 2018 नंतर अनिवासी भारतीय मतदारांची संख्या वाढलेली दिसते. 2012 मध्ये एकूण एनआरआय मतदारांची संख्या 10,002 (9547 पुरुष, 455 महिला) इतकी होती. 2018 मध्ये ही संख्या वाढून 24,507 (1942 महिला, 22565 पुरुष) वर पोहोचली. 2019 मध्ये हा आकडा थेट 71735 वर गेला आहे. यामध्य 4849 महिला, तर 66,866 पुरुष मतदारांचा समावेश आहे. याचाच अर्थ 2012 पासून 2019 पर्यंत एनआरआय मतदारांची संख्या सात पटींनी वाढली आहे. अर्थात पुरुषांच्या तुलनेत एनआरआय महिला मतदारांची संख्या तितकीशी वाढलेली नाही.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ 8 हजार एनआरआय मतदारांनीच मतदान केले होते. वास्तविक तेव्हा नोंदणीकृत एनआरआय मतदारांची संख्या 13,039 इतकी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)