हे असे किती दिवस चालणार

दाभोळकर-पानसरे हत्याप्रकरण ः हायकोर्टाने तपास यंत्रणांना फटकारले
गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना हजर राहण्याचे आदेश

मुंबई – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी तपास यंत्रणांच्या तपास अहवालावर उच्च न्यायालयाने तिव्र नाराजी व्यक्त करत आज संताप व्यक्त केला. कासवाच्या गतीने सुरू असलेला तपास पूर्वापारपासून सुरू असलेली प्राथमिक तपास पद्धती अवलंबल्याचे दिसून येते. परंतु यातून काहीच निष्पन्न होत नाही. असे किती दिवस चालणार, असा संतप्त सवाल उपस्थित करून आता न्यायालयाच्या संहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दांत तंबी दिली. तसेच पुढील सुनावणीवेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना न्यायालयात जातीने हजर राहण्याचे आदेश दिले.

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर आज न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.
आज सुनावणीच्यावेळी नेहमीप्रमाणे तपास यंत्रणांनी तपासाचा प्रगत अहवाल न्यायालयात सादर केला. मात्र तपास अहवाल पाहून संतगतीने सुरू असलेल्या तपासवर न्यायालयाने तिव्र नाराजी व्यक्‍त केली.

गेली पाच वर्षे एवढ्या संतगतीने तपास सुरू आहे. परंतू याप्रकरणी पोलीस कोणालाच दोषी ठरवत नाही. याबाबत स्पष्टीकरण ही दिले जात नाही अथवा कोणा अधिका-याविरोधात मेमोही काढला जात नाही.न्यायालयाने लक्ष घातल्यानंतर दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. असे सुरू राहिले तर समाजात काय संदेश जातोय याची तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का असे खडेबोल सुनावत गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना कोर्टात जातीने हजर राहण्याचे आदेश देत सुनावणी 28 मार्चपर्यंत तहकूब केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)