बॅंकेचा आरोग्य विमा कितपत उपयुक्त? (भाग-२)

बॅंकेचा आरोग्य विमा कितपत उपयुक्त? (भाग-१)

अर्थात आरोग्य विमा क्षेत्रात अद्याप पोर्टबिलिटी सुविधा उपलब्ध आहे. आपण अन्य कोणताही कंपनीत पॉलिसी पोर्ट करू शकता. मात्र बॅंक पॉलिसी तुलनेने स्वस्त असल्याने पोर्टची सुविधा मिळू शकत नाही. अशा स्थितीत बॅंकेशी संबंध तोडल्यानंतर नवीन कंपनी आपल्या वयाच्या आधारावर हप्त्याचे आकलन करेल. अधिक हप्ता असल्यास आपल्यांला सर्व लाभ दिले जातील. उदा. जर सहा वर्षांपासून आपण बॅंक ऑफ बडोदाचे पॉलिसीधारक असाल तर आतापर्यंत पाच लाखाच्या विमा कवचसाठी 7 हजार 800 रुपये हप्ता द्यावा लागत होता. हा हप्ता चौघाच्या कुटुंबासाठी परवडणारा आहे. जर बॅंकेशी करार संपला आणि ही पॉलिसी अन्य कंपनीत पोर्ट करू इच्छित असाल तर यासाठी विमा हप्त्याची रक्कम तिप्पट वाढेल आणि ती जवळपास 24 हजार रुपये होईल. ही रक्कम मध्यमवर्गीय कुटुंबीयांना परवडणारी नाही. जर बॅंक अन्य कंपनीशी करार करत असेल तर त्यास वेळ लागू शकतो. अशा स्थितीत आपल्याला नवीन पॉलिसी खरेदी करावी लागेल. अशा वेळी आपल्याला आरोग्य विमा पॉलिसीचे लाभ घेण्यासाठी विचारपूर्वक पावले टाकावी लागतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्याय कोणकोणते?
म्हणूनच या पॉलिसीचा हप्ता कमी असला तरी आपत्कालिन स्थितीत यावर अवलंबून राहू नये. जर आपण वेतनदार असाल तर आपल्यासाठी अधिक जोखमीचे ग्रुप इन्शुरन्स उपयुक्त ठरू शकतात. ग्रुप इन्शुरन्स नसेल तर चांगल्या विमा पॉलिसीबरोबर टॉपअप पॉलिसी खरेदी करू शकतो. यात कमी हप्त्याबरोबरच विमा संरक्षण वाढेल. जर आपण एखाद्या आजाराने पीडित असाल तर यासाठी विशिष्ट पॉलिसीची खरेदी करा. शेवटी बॅंकेच्या आरोग्य विमा पॉलिसीवर अवलंबून असाल तर सर्व जोखमीसाठी तयार राहणे गरजेचे आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला आयुष्यातील कोणत्याही पातळीवर आरोग्य विमा उतरवताना अधिक हप्ता भरावा लागेल. म्हणूनच आजच योग्य आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करा. आयुष्यभरासाठी नसली तरी दीर्घकाळाचा त्यात विचार केलेला असावा, अशी पॉलिसी असावी.

बॅंक विम्याची वैशिष्ट्ये
बॅंक कोणतीही असो ती विमा कंपनीशी करार करून खातेदारांना आरोग्य विमा प्रदान करते. उदा. बॅंक ऑफ बडोदाचा नॅशनल इन्शुरन्सशी आणि पंजाब नॅशनल बॅंकेचा ओरिएंटल इन्शुरन्सशी करार आहे. हप्ता कमी ठेवण्यासाठी बॅंकांकडून या पॉलिसी ठोक स्वरुपात खरेदी केल्या जातात. या कारणामुळे पॉलिसीधारकांना विमा पॉलिसीची साधी कागदपत्रे मिळतात. प्रमाणपत्र दिले जात नाही. बॅंकेचा विमा कंपनीशी करार असल्याने ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. साहजिकच या पॉलिसीची वैशिष्ट्ये अन्य कंपन्यांच्या विम्याच्या तुलनेत अधिक चांगली असू शकतात. अर्थात काही विम्यात मर्यादा असतात. अनेक बॅंका जसे की, खोलीचे भाडे, ऑपरेशन आणि को-पेमेंट या मर्यादेत राहूनच विमा पॉलिसी प्रदान करतात. उदा. बॅंक ऑफ बडोदा ही बॅंक वयाच्या 65 वर्षापर्यंत खातेदारांना निश्‍चित हप्त्यावर पॉलिसी देते. पीएनबीच्या ओरिएंटल रॉयल मेडिकेडचा विचार केला तर त्यात खोलीचे भाडे आणि आयसीयूसाठी एक ते दोन टक्के सबलिमिट आहे. यात काही अतिरिक्त सुविधा देखील आहेत. यामध्ये वार्षिक तपासणी आणि भरती होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतरच्या खर्चाचा समावेश आहे. या विमा पॉलिसी अधिक वयाच्या लोकांसाठी आकर्षक वैशिष्ट्यासह उपलब्ध आहेत. यात बॅंक केवळ मध्यस्थाची भूमिका बजावते. सर्व दावे-प्रतिदावे विमा कंपनी आणि पॉलिसीधारकांमध्ये होतात.

– जगदीश काळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)