बॅंकेचा आरोग्य विमा कितपत उपयुक्त? (भाग-१)

बॅंकेकडून खातेदारांसाठी उतरवण्यात आलेला आरोग्य विम्याचा हप्ता जरी कमी वाटत असला तरी आरोग्याविषयी आणीबाणीच्या काळात केवळ अशा पॉलिसीवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. बॅंकाकडून खरेदी केलेल्या आरोग्य विम्याचा हप्ता हा खूपच कमी असतो. दीर्घकाळासाठी काढलेल्या या पॉलिसीचा लाभार्थ्याला खूप फायदा होतो. मात्र यात काही त्रुटी देखील आहेत. जर बॅंकेचा विमा कंपनीशी करार संपुष्टात आला आला तर त्याचा भुर्दंड पॉलिसीधारकाला भरावा लागतोच, त्याचबरोबर आरोग्य विम्याचा कालावधी नवीन पॉलिसीत गृहित धरला जाईलच याची खात्री देता येत नाही. कमी हप्त्याच्या कारणांमुळे विद्यमान पॉलिसी ही दुसऱ्या कंपनीत पोर्टही होऊ शकत नाही. अशा स्थितीत ग्राहक या पॉलिसीचे जुने लाभ आणि सुविधांपासून वंचित राहतो. म्हणूनच अशा स्थितीत बॅंकेच्या आरोग्य विम्यावर अवलंबून राहू नये.

आरोग्य विम्याचा लाभ घेताना त्याचा अधिक हप्ता हा मोठा अडसर मानला जातो. कारण आपण अधिक विमा कवच घेतले असेल किंवा वय अधिक असेल तर विमा कवचाचा भार वाहने सोपे नाही. या दोन्ही स्थितीत हप्त्याची रक्कम ही आपल्या बजेटबाहेर जाते आणि परिणामी आपण नाईलाजाने कमी संरक्षण देणारी पॉलिसीची निवड करतो. अशा स्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकाकडून दिला जाणारा आरोग्य विमा हा आकर्षक आणि परवडणारा असतो. बॅंकेचा आरोग्य विमा हा सर्व वयोगटातील खातेदारांना कमी हप्त्यात मिळत असल्याने ही विमा पॉलिसी उपयुक्त सिद्ध होते. संबंधित खातेदाराकडे अगोदरपासूनच विमा असेल किंवा अधिक वय किंवा कमी शुल्काचे आरोग्य विमा असतील तरीही बॅंकेचा आरोग्य विमा हा अडचणीच्या काळात उपयुक्त ठरतो. अर्थात याप्रकारच्या विमा योजनात काही उणिवा देखील आहेत. म्हणूनच या कारणामुळे आजारपणाच्या काळात अशा पॉलिसीवर अवलंबून राहणे गैर आहे. म्हणूनच बॅंकेकडून आरोग्य विम्याची खरेदी करताना त्याचा फायदा आणि नुकसान जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॅंकेचा आरोग्य विमा कितपत उपयुक्त? (भाग-२)

नुकसान काय ?
बॅंकेच्या आरोग्य विमा पॉलिसीत काही नुकसानकारक बाबींचाही समावेश आहे. या गोष्टीचे आकलन पॉलिसीधारकांनी करणे गरजेचे आहे.
– सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विमा पॉलिसीत बॅंक केवळ मध्यस्थ आहे. एकदा पॉलिसी केल्यानंतर या प्रकरणात बॅंकेचा काही संबंध राहत नाही. कोणत्याही वादाचा निपटारा करण्यासाठी आपल्याला विमा कंपनीकडेच जावे लागते. या प्रकरणात बॅंक कोणत्याही प्रकारची मदत करत नाही, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपण एकदा विमा उतरवल्यानंतर सेवेसाठी बॅंकेवर अवलंबून राहू शकत नाहीत.
– दुसरे म्हणजे या उत्पादनात विमा कवचाची कमाल मर्यादा असते. कारण ही पॉलिसी वाजवी दरात मोठ्या संख्येच्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिलेली असते आणि त्यानुसार पॉलिसीचे नियम, अटी तयार केलेल्या असतात. त्यामुळे कंपन्या विम्याची कमाल मर्यादा असते. त्यामुळे अशा प्रकारची पॉलिसी खरेदी करताना त्याचे आकलन करणे गरजेचे आहे. या पॉलिसीचे विमा कवच कुटुंबासाठी पुरेसे आहे की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. उदा. जर आपल्या कंपनीचे विमा कवच पाच लाखाचे असतील तर महानगरात राहणाऱ्या चौघांच्या कुटुंबासाठी पुरेसे नाही.
– ही पॉलिसी करारातून निश्‍चित केलेली असते आणि विमा कंपनीला या करारातून केवळ लाभच पदरात पाडून घ्यायचा असतो. जर विमा कंपनीला तोटा झाल्यास विमा कंपनी बॅंकेशी करार तोडू शकते किंवा बॅंक देखील करार मोडू शकते. अशा स्थितीत पॉलिसीधारकाकडे कोणताही पर्याय राहत नाही.

– जगदीश काळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)