धनगर समाजाची कागदपत्रे खरंच गायब झाली की, गहाळ केली?- राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: देशात ‘चौकीदार’ आणि महाराष्ट्रात ‘पहारेदार’ असूनही महत्त्वाची कागदपत्रे गायब होतातच कशी? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे. कागदपत्रे गहाळ करून सरकार धनगर समाजाची फसवणूक करते आहे. कागदपत्रे खरेच गायब झाली की, गहाळ करण्यात आली? असा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.

धनगर आरक्षणाची कागदपत्र हायकोर्टातून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. धनगर आरक्षणाबाबत आज मुंबई हायकोर्टात अंतिम सुनावणी होणार होती, पण सरकारी वकिलांनी धनगर आरक्षणाचे कागदपत्र सापडत नाहीत, अशी माहिती दिल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

-Ads-

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)