… तर तो राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा खून! -शिवसेना

मुंबई:”सरकारच्या शैक्षणिक यंत्रणेला आव्हान देणारी अशी समांतर शैक्षणिक व्यवस्था उभी राहतेच कशी? सरकारही त्याला खतपाणी घालते. सगळाच भर जर खासगी शिकवण्यांवर द्यायचा असेल तर शाळा आणि महाविद्यालये हवीतच कशाला?” असा कणखर प्रश्न शिवसेनेने राज्यसरकारला विचारला आहे.

‘स्टेप बाय स्टेप’ क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या व्यावसायिक वादातूनच झाल्याचे उघड झाले आहे. ‘कुमार मॅथ्स’ क्लासेसचे संचालक चंदनकुमार यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, आजच्या सामनातून या प्रकरणावर भाष्य केले असून  राज्यसरकारवर ताशेरे ओढले आहेत. “लातुरात आज खासगी क्लासेसच्या माध्यमातून एक समांतर शिक्षणव्यवस्था उभी राहिली आहे. त्यातून एका क्लासचालकाचा खून झाला. ही केवळ एका व्यक्तीची हत्या नाही तर तो राज्याच्या शिक्षणव्यवस्थेचा खून आहे. खासगी क्लासेसचा सुळसुळाट, त्यांचा अनियंत्रित कारभार आणि पालकांची अनिर्बंध लुटमार सरकार आणखी किती दिवस उघडय़ा डोळ्याने बघत बसणार आहे?” असा कणखर प्रश्न आजच्या सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)