सदनिकाधारकांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड

भूमि अभिलेख विभागाकडून शासनाला प्रस्ताव सादर

पुणे – प्रत्येक सदनिकाधारकांना जमिन मालकीचा महत्त्वाचा पुरावा असलेला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय भूमि अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव नुकताच राज्य शासनाकडे सादर केला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्येक सदनिका धारकास पुरवणी प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. यामुळे प्रत्येक सदनिका धारकास जमिन मालकीचा पुरावा प्राप्त होणार आहे. तसेच भूकंप, पूर आदी नैसर्गिक आपत्तीमध्ये काही दुर्घटना घडल्यास त्या जागेवर संबधित व्यक्तीचा हक्क कायम राहणार आहे. प्रॉपटी कार्डमुळे व्यवहारांमध्ये पादर्शकता येणार असून फसवणूक रोखण्यास यामुळे मदत होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदनिकांच्या बाबतीत मालकी हक्क सिध्द करण्यासाठी मनपाकडे कर भरल्याची पावती आणि खरेदी-विक्री करारनामा एवढाच दस्त उपलब्ध असतो. ज्या जागेवर इमारत उभारली आहे. त्या जागेच्या प्रॉपर्टी कार्डवर गृहनिर्माण सोसायटी अथवा अपार्टमेंट नोंद असते. तसेच सर्व सदनिका धारकांची एकत्रित नावे असतात. त्यामुळे एका व्यक्तीने कर्ज घेतले तरी प्रॉपर्टी कार्डवर इतर हक्कामध्ये याचा उल्लेख असतो. त्यामुळे हा बोजा प्रॉपटी कार्ड नोंदविण्यात येतो. प्रॉपटी कार्डवर हा बोजा नोंदविण्यात येत असल्याने काही वेळेस त्याचा त्रास बाकीच्या सदस्यांनाही सहन करावा लागतो.

या सर्व पार्श्‍वभूमीवर व्हर्टीकल इमारतींना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य प्रॉपर्टी व्यतिरिक्त प्रत्येक सदनिका धारकास पुरवणी प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. ज्या सदनिका धारकाने सदनिका तारण ठेवली असेल अथवा त्यावर कर्ज घेतले असेल त्याची नोंद पुरवणी प्रॉपर्टी कार्डवर घेतली जाणार आहे. प्रत्येक सदनिकांचे प्रॉपर्टी कार्ड वेगळे मिळणार असल्याने कोणत्या सदनिकेवर कर्ज आहे, याचा मालक कोण याची नोंद होणार आहे. यामुळे खरेदीदार व्यक्तीला याची माहिती मिळणार आहे.

प्रॉपटी कार्ड हे महसूल विषयक महत्त्वाचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने सदनिकाधारकाचे हितसंबध जोपासले जाणार आहे. त्यांचे जागेवरील हक्क अबाधित राहणार आहे. राज्य शासनाकडे याविषयाची प्रस्ताव भूमि अभिलेख विभागाने नुकताच सादर केला आहे. शासनही याबाबत सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)