सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आज भारतासमोर यजमान मलेशियाचे आव्हान

मलेशिया – सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत तिसऱ्या साखळी सामन्यात भारतासमोर आज मलेशियाचे आव्हान आहे. अंतिम फेरीत मजल मारण्याचे उद्दिष्ठ बाळगणाऱ्या भारतीय संघाला यजमान मलेशिया वर विजय मिळवावा लागेल.

तत्पूर्वी सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेची दिमाखदार सुरुवात करत भारताने शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या जपानला २-० ने नमवले होते. मात्र त्यानंतरच्या दुसऱ्याच दक्षिण कोरिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाला १-१ असे बरोबरीत समाधान मानावे लागले होते. या सामन्यात अंतिम वेळेपर्यंत मिळालेली आघाडी भारताला कायम ठेवण्यात अपयश आले होते. त्यामुळे भारतीय संघाला चुका टाळत बलाढ्य मलेशिया सोबत लढावे लागणार आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला मलेशियाविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)