माजी सैनिकांच्या आरोग्यसेवेत हॉस्पिटल्सचे घोटाळे- संरक्षण मंत्री

अहमदाबाद (गुजरात): माजी सैनिकांच्या आरोग्यसेवांमध्ये बिन सरकारी हॉस्पिटल्स घोटाळा करत असल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. या प्रकरणी सरकार तपास करत आहे आणि तपासात दोषी आढळणाऱ्या हॉस्पिटल्सवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती माजी सैनिकांच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दिली. माजी सैनिकांचा आरोग्य सेवांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत.

ईसीएचएस (एक्‍स-सर्व्हिसमेन कॉंट्रिब्यूटरी हेल्द स्कीम) मध्ये अनेक समस्या आहेत. माजी सैनिक आणि सरकारलाही यामध्ये समस्यांचा सामना करावा लागत असून अनेक हॉस्पिटल्सविरुद्ध मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यविषयक साधी प्रकरंणेदेखील इमरजन्सी प्रकरणे दाखवून मोठी फी वसूल करण्यात येत असल्याचे ऑडिटमध्ये दिसून आलेले आहे. अशा प्रकारे अनावश्‍यक तपासण्या करून मोठमोठी बिले आकारण्यात येत असल्याचे दिसून आलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशा 1446 बिन-लष्करी हॉस्पिटल्सपैकी अनेक हॉस्पिटल्सची बिले रोखण्यात आलेली आहेत आणि ही बिले योग्य आहेत की नाहीत याची चौकशी चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)