आगरा – उत्तर प्रदेशच्या आगरा जिल्ह्यातील एका सरकारी इस्पितळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम काढला आहे. महिला कर्मचाऱ्यांनी मेक अप न करता कामाला यावे तसेच पुरुषांनी जीन्स आणि टीशर्ट परिधान करू नये, असे इस्पितळाच्या प्रशासनाने म्हटले आहे.
आगराच्या फतेहबाद सामूहिक आरोग्य केंद्राने तशा सूचनाच कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. महिला कर्मचाऱ्यानी मेक अप न करता कामाला हजर राहावे तसेच पाश्चिमात्य कपड्यांऐवजी साडी किंवा सलवार कमीज परिधान करावे.
फक्त महिलाच नव्हे तर पुरुष कर्मचाऱ्यांनाही प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. पुरुष कर्मचाऱ्यांनीही जीन्स टीशर्ट न घालता त्यांनी फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट आणि काळे बूट घालणे अपेक्षित आहे. बऱ्याच चर्चेनंतर एका बैठकीत हा निर्णय घेतला असून प्रशासनाने तशीच सूचनाच जारी केली आहे.