धोंडेवाडी हद्दीत बिबट्याकडून घोड्याचा फडशा

कराड – धोंडेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत बिबट्याच्या मादीचे दोन बछडे सापडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा येथील परिसरातील गडाळकी नावाच्या शिवारात असलेल्या वस्तीवर बांधलेल्या घोड्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धोंडेवाडी परिसरात गेल्या आठवड्यात उसाच्या फडात दोन बिबट्यांचे मादी बछडे सापडले होते. त्यापैकी एक मृत तर दुसरा बछडा सुखरूप अवस्थेत आढळून आला होता. दुसऱ्या बछड्यास सहाव्या दिवशी त्याच्या आईने सुखरूप नेले होते. यानंतर बिबट्याची मादी शिवारातून निघून गेली असेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र, बिबट्याच्या मादीने या वस्तीवर बांधलेल्या घोड्यावर अचानकपणे हल्ला करत ठार मारून घोड्याच्या पोटाचा काही भाग बिबट्याने खाऊन तो पसार झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सदरचा बिबट्या गेल्या चार दिवसांपासून उपाशी असल्याने तो भक्ष्याच्या शोधात फिरत राहिला होता. त्याला काही खाद्य मिळाले नसल्याने बिबट्याने चक्क मानवी वस्तीत प्रवेश केला आणि गडाळकी नावाच्या वस्तीवर बांधलेल्या घोड्यावर हल्ला करुन त्याला ठार केले. बिबट्याची मादी या परिसरात फिरत असल्याने ग्रामस्थ शिवारात जायला धजवत नाहीत. यासाठी वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावून त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशीही मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)