उत्सुकता भविष्याची : 12 ते 18 नोव्हेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

अनिता केळकर 

(लेखिका – ज्योतिषतज्ज्ञ) 

 

लग्नी हर्षल वक्री, चतुर्थात राहू, सप्तमात रवी, शुक्र वक्री जो 16ला मार्गी होत आहे. अष्टमात गुरु, बुध जो 17 ता. वक्री होत आहे. नवमात शनी, प्लुटो दशमात केतू तर लाभात मंगळ व नेप्च्यून वक्री आहे. कामात उत्साह वाढवणारे ग्रहमान आहे. वेळ मजेत जाईल. प्रवासाचे योग येतील. कामात थोडा निवांतपणा जाणवेल. मात्र चौफेर सतर्क रहा. कोणावरही विसंबून राहू नका.

प्रवासाचे योग
कामाचा उत्साह वाढवणारे ग्रहमान आहे. व्यवसायात अवघड अशक्‍यप्राय वाटणाऱ्या कामात यश मिळवाल. पैशाची स्थिती सुधारेल. नोकरीत वेगळ्या कामामुळे थोडे सतर्क राहाल. योग्य वेळी योग्य व्यक्‍तींशी मैत्री होईल. प्रवासाचे योग येतील. घरात कोणावरही विसंबून राहू नका. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्या. महिलांनी उरक कामे काढू नयेत. अध्यात्मिक प्रगती साधाल.
शुभ दिनांक : 12, 13, 14, 15, 16, 17


बेत गुप्त ठेवा
केलेल्या कामाचे ताबडतोब पैसे मिळतील ही अपेक्षा ठेवू नका. तेव्हा व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न राहील. नवीन कामे दृष्टीक्षेपात असतील. हितचिंतकाची मदत आवश्‍यक येथे घ्या. नोकरीत कामाची योग्य आखणी करा. कामातील बेत गुप्त ठेवा. भविष्याची तरतूद करून ठेवा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशमनाची संधी येईल.
शुभ दिनांक : 14, 15, 16, 17, 18


विशेष कमाई
सभोवतालच्या व्यक्‍तींचा नवीन अनुभव घ्याल. त्यातूनच शहाणे बनून योग्य कृती करा. व्यवसायात महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. फायदा मिळवून देणारी कामे हाती घ्या. कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. जोडधंद्यातून विशेष कमाई करण्याची संधी मिळेल. घरात वातावरण गढूळ राहील. मनातील शंका वेळीच निरसन करा म्हणजेच चुकीचे मार्गक्रमण थांबेल.
शुभ दिनांक : 12, 13, 16, 17, 18


पैशाची चिंता मिटेल
ग्रहांची मर्जी तुमचेवर आहे त्यामुळे कमी श्रमात जास्त यश संपादन करू शकाल. व्यवसायात उद्दिष्टे व धोरणे ठरवून कृती करा. वेळेचे बंधन ठेवून कामांना गती द्या. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. मात्र, आत्मविश्‍वास टाळा. घरात इतर व्यक्‍तींचे अंतरंग ओळखून वागा. मुलांकडून सुवार्ता कळेल. महिलांचा आत्मविश्‍वास वाढेल. प्रकृती सुधारेल.
शुभ दिनांक : 14, 15


खर्च होईल
तुमच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालणारे ग्रहमान आहे. मनातील बेत/ इच्छा प्रत्यक्षात साकार करण्याची सुसंधी मिळेल. व्यवसायात कामात दक्ष राहा. जुनी देणी देऊन मगच नवीन कामात लक्ष घाला. दिलेला शब्द व आश्‍वासन पाळा. नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. कामात तत्पर राहा. इतर व्यक्‍तींच्या आवश्‍यक गरजा पूर्ण करण्यासाठी चार पैसे जादा खर्च होतील.
शुभ दिनांक : 12, 13, 16, 17, 18


कामाचा वेग व उत्पन्न वाढेल तुमच्या कर्तृत्वाला झळाळी देणारे ग्रहमान लाभले आहे. त्याचा लाभ घ्या. व्यवसायात
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लवचिक धोरण स्वीकारून कामाचा वेग व फायदा वाढवा. उत्पन्न वाढवण्यावर भर राहील. पैशाची चिंता मिटेल. तणाव कमी होईल. नोकरीत पगारवाढ बढती व बदलीच्या प्रयत्नांना यश येईल. उच्च शिक्षणासाठी परदेशगमनाची
संधी येईल.
शुभ दिनांक : 12, 13,14, 15


प्रगतीला संधी
तुमच्या हळव्या स्वभावामुळे भावनेला प्राधान्य द्याल व तेथेच निराशा पदरी येईल. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्‍तींचा कार्यकारण भाव काय आहे? हे कळणार नाही. त्यामुळे आपले काम बरे की आपण बरे हे धोरण ठेवा. प्रगतीला पूरक संधी चालून येईल. परंतु त्याची पडताळणी घेऊन मगच पुढे जा. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना मतलबापुरती तुमची आठवण होईल. डोके शांत ठेवा.
शुभ दिनांक : 12, 13, 14, 15, 16


पैशाची तजवीज होईल
स्वयंसिद्ध राहण्याचा तुमचा स्वभाव आहे परंतु या सप्ताहात इच्छा नसतानाही दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागेल. व्यवसायात पैशाची चणचण भासेल. त्यामुळे कामांना विलंब होईल. नोकरीत स्वत:चे काम उरकून इतरांनाही मदत कराल. वरिष्ठांना तुमचेकडून बरीच अपेक्षा राहील. घरात सहजीवनांचा आनंद उपभोगता येईल. गैरसमजुतीने होणारे घोटाळे टाळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन एकाग्र करावे.
शुभ दिनांक : 12,13, 14, 15, 16


आर्थिक चिंता मिटेल
अडथळ्याची शर्यत पार करून पुढे जाण्याचा ध्यास असेल. त्यात यशही मिळेल. थोडी सबुरी ठेवा. व्यवसायात इतरांवर विसंबून न राहता कामाचे नियोजन करा. महत्वाची कामे स्वत: करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्या.. पैशांची सोय ओळखीमुळे होईल. नोकरीत वरिष्ठांना दिलेला शब्द पाळा. अनपेक्षित कामाची जबाबदारी वाढेल. नातेवाईकांच्या भेटीने आनंद.
शुभ दिनांक : 12, 13, 14, 15


महिलांसाठी सुवार्ता
शनी तुमचा राशीधिपती आहे त्यामुळे स्वत:ला हवे तसे बिनबोभाट करण्यात तुमचा हातखंडा आहे. व्यवसायात योग्य व्यक्‍तींकडून योग्य कामे करून घेऊन कामांना गती द्याल. नवीन पद्धतीच्या कामासाठी धोरणात बदल करावा लागेल. भविष्याची तरतूद योग्य प्रकारे करून ठेवाल. नोकरीत वेगळ्या कामामुळे तुमची धावपळ होईल. घरात महत्वाचे प्रश्‍न हाताळताना गोंधळाची अवस्था होईल. शब्दाला मान मिळेल.
शुभ दिनांक : 14, 15, 16


कामाचा ताण
घर व व्यवसायात दोन्हीकडे सारखेच लक्ष द्याल. व्यवसायात काही बदल करावे लागतील. खर्चाचे प्रमण वाढले तरी ते खर्च आवश्‍यकच असतील. भांडवलासाठी पैशाची उभारणी करावी लागेल. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. त्यामुळे सोडून देण्याचे विचार मनात येतील. पण घाई नको. घरात नेहमीच्या कामांकडे दुर्लक्ष होईल व नको त्या कामात बराच वेळ जाईल.
शुभ दिनांक : 12, 13, 16, 17


सुवार्ता कळेल
तुमच्या मताशी तुम्ही ठाम राहाल. व्यवसायात प्रगती समाधानकारक राहील. हितचिंतकांची मदत योग्य वेळी मिळेल. कामांना गती येईल. नवीन कामेही मिळतील. नोकरीत स्वत: पुढाकार घेऊन कामे पूर्ण कराल. उत्साही राहाल. जोडधंद्यातून विशेष कमाई करता येईल. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे कर्तृत्व दिसून येईल व कौतुकाची थाप मिळेल. घरात वातावरण आनंदी राहील. सुवार्ता कळेल.
शुभ दिनांक : 12, 13, 14, 15


 

What is your reaction?
19 :thumbsup:
6 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
2 :blush:
2 :cry:
2 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)