उत्सुकता भविष्याची: 8 ते 14 ऑक्‍टोबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

अनिता केळकर (लेखिका – ज्योतिषतज्ज्ञ)

मेषेत हर्षल वक्री, कर्केत राहू, कन्येत रवी, बुध, तुळेत शुक्र वक्री व गुरू जो 12 ऑक्‍टोबरला वृश्‍चिक राशीमध्ये जात आहे. धनुमध्ये शनी व प्लुटो, मकरेत केतू व मंगळ तर कुंभेत नेप्च्यून वक्री आहे. कामाचे व वेळेचे योग्य नियोजन केले तर लाभ होईल. प्रयत्नांना महत्त्व द्यावे लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला अवश्‍य घ्यावा. पैशाची सोय होईल.

घाईने निर्णय नको 
राशीच्या अष्टमात गुरू वर्षभर राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक कामात प्रयत्नांना महत्त्व द्यावे लागेल. जास्त ताण न घेता जेवढे तुम्हास पटेल, रुचेल तेवढेच काम घ्या. अर्धवट कामे पूर्ण करा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. तरुणांनी घाईने निर्णय घेऊ नयेत. घरामध्ये तुम्हाला थोडी तुमच्या इच्छा आकांक्षाना मुरड घालावी लागेल.
शुभ दिनांक : 10,11 

प्रवास घडेल 
महत्वाच्या ग्रहांची साथ तुम्हाला आहे. त्यामुळे प्रगतीसाठी जी धडपड तुम्ही करत होता त्यात सफलता मिळेल. रेंगाळलेल्या योजना मूर्त स्वरुपात साकार होतील. नोकरीत तुम्हास आवडेल असे काम मिळेल. विरंगुळ्यासांठी छोटा प्रवास कराल. घरात शुभकार्ये ठरतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग. कलाकार- खेळाडूंना प्रसिद्धीचे योग.
शुभ दिनांक : 8, 9, 12, 13, 14 

श्रेय मिळेल 
गुरु राशीच्या षष्ठात आल्याने त्याची साथ तुम्हाला मिळणार नाही. (पूर्वीइतकी) तरी यापुढे तुमची प्रत्येक कृती सावधपणे करा. शारीरिक कुवत ओळखून त्याप्रमाणे कामाचे स्वरुप ठेवा. व्यवसायात केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. घरात कुटुंबासमवेत वेळ घालवाल. तरुणांना मित्र मंडळीच्या सहवासासाठी उत्साह येईल. वृद्धांना तीर्थयात्रा घडेल.
शुभ दिनांक : 8, 9, 10, 11 

आनंदवार्ता कळेल
गुरूची पंचमातील साथ मोलाची ठरेल. व्यवसायात निर्माण झालेला तणाव कमी होईल. ज्या कामाची काळजी वाटत होती त्यात आशादायक चित्र दिसेल. तुमच्या मनाप्रमाणे घटना घडल्याने यशाची खात्री वाटेल. नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कामात सफलता मिळेल. घरात वातावरण आनंदी राहील. मुलांकडून चांगली बातमी कळेल.
शुभ दिनांक : 8,9,10,11,12,13,14 

आनंद सहजसाध्य 
चतुर्थातील गुरू गृहसौख्याचा आनंद भरभरून देईल. व्यवसायात तुमच्या महत्वाकांक्षी कृतीने प्रत्येक गोष्ट सहजसाध्य कराल. नवीन विस्तारांच्या कामांना प्राधान्य द्याल. कामातील बदल फायदा मिळवून देईल. जादा सवलती व अधिकारही मिळतील. विवाहोत्सुक तरुणांचे विवाह ठरतील. नवीन जागेत स्थलांतराचे बेत सफल होतील.
शुभ दिनांक : 8,9,10,11,12,13,14 

कामात उत्साह 
गुरू राशीच्या तृतीयेत पुढील वर्षभर राहणार आहे. त्यामुळे तुमच्यातील कलागुणांना वाव मिळेल. परदेश व्यवहारांना महत्व येईल. नोकरीत तुम्हाला व तुमच्या कामाला महत्व मिळेल. जोडधंद्यातून जादा कमाई होईल. तुमचा थोडा वेळ तरी घरातील व्यक्‍तींबरोबर मजेत घालवाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छा साकार झाल्याचा आनंद मिळेल.
शुभ दिनांक : 8,9,10,11,12,13,14 

आर्थिक स्थिती भक्कम 
पैशाची घडी सुरळीत करण्यासाठी धनस्थानातील गुरू मदत करील. परंतु भावनेच्या आहारी न जाता कामाचे योग्य नियोजन केले तर त्याचा आनंद मिळेल. व्यवसायात नेहमीपेक्षा उत्पन्न वाढेल. जीवनात स्थिरता येईल. नवीन कामे मिळतील. नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल.तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करता येईल.
शुभ दिनांक : 10, 11, 12, 13, 14 

वसुली होईल 
राशीत असलेला गुरू अनेक अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा आत्मविश्‍वास देईल. व्यवसायात महत्वाची कामे वेळेत उरका म्हणजे वसुली होईल. नोकरीत कामाचा ताण कमी झाल्याने सुटकेचा निश्‍वास टाकाल. व्यक्‍तिगत जीवनात आशादायक घटना घडल्याने तुमची निराशा दूर होईल. कुटुंबासमवेत खरेदीचे बेत आखाल.
शुभ दिनांक : 8. 9. 12, 13, 14 

आर्थिक चिंता मिटेल
जिद्द व चिकाटी या जोरावर कामात प्रगती कराल. व्यवसायात खर्चाचे प्रमाण वाढेल. मनाप्रमाणे सर्व गोष्टी होतीलच असे नाही. तरी मनाची तयारी ठेवा. मोठ्या योजनांच्या मागे न धावता “जैसे थे’ धोरण ठेवा. नोकरीत आळस न करता तुमच्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडा. घरात कोणताही प्रश्‍न विचारपूर्वक हाताळा.
 शुभ दिनांक : 8, 9, 10, 11 

हितशत्रूंपासून सावध 
आर्थिक उब व सुख मिळणार असल्याने आनंदी राहाल. व्यवसायात चांगली वाढ होईल. स्थिरता मिळून प्रगतीची नवीन दिशा मिळेल. नोकरीत चांगल्या संधी दृष्टीक्षेपात येतील. बेकार व्यक्‍तींना कामधंदा मिळाल्याने त्यांची निराशा दूर होईल. शेअर्स व्यवहारात फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. प्रकृतीमान सुधारेल.
शुभ दिनांक : 8,9,10,11,12,13,14 

जुनी येणी वसूल होतील 
व्यवसायात तुमच्या अंगी असलेले कलागुण दाखविण्याची उत्तम संधी मिळेल. करिअरच्या दृष्टीने तुमच्या कर्तृत्वाला उजाळा येईल. प्रगतीचा महत्वाचा टप्पा गाठाल. नोकरीत महत्वाच्या कामासाठी तुमची निवड करतील. त्यासाठी जादा सवलती व अधिकारही देतील. तरुणांना स्थिरता लाभेल. मित्रांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.
शुभ दिनांक : 10, 11, 12, 13, 14 

सुवार्ता कळेल 
तुमच्या प्रगतीला पूरक ग्रहमान लाभल्याने कामात प्रगती होईल व तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायात आर्थिक पाठबळ मिळेल. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्याल. व्यक्‍तिगत जीवनात आनंदाची घटना घडेल. सुवार्ता कळेल. अपेक्षित कामांना गती येईल. हितचिंतक मदत करतील. सामूहिक कामात प्रतिष्ठा मिळेल.
शुभ दिनांक : 8, 9, 12, 13, 14 

What is your reaction?
3 :thumbsup:
8 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)