उत्सुकता भविष्याची… (30 जुलै ते 5 ऑगस्ट 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे)

अनिता केळकर
मेषेत हर्षल, कर्केत रवी, राहू व बुध वक्री, कन्येत शुक्र, तुळेत गुरु, धनूमध्ये शनि व प्लुटो वक्री, मकरेत केतू व मंगळ वक्री तर कुंभेत नेप्चून वक्री आहे. ग्रहमान तुमचा उत्साह द्विगुणीत करणारा असेल. चांगली घटना घडेल. मनाप्रमाणे कामे होतील. गृहसौख्याचा आनंद उपभोगाल. छोटा प्रवास घडेल. प्रकृतीमान सुधारेल.
मेष: कामाचे श्रेय मिळेल
रवी, बुध, गुरु, मंगळ यासारखे महत्त्वाचे ग्रह साथ देणारे आहेत. तुमचा उत्साह द्विगुणीत करणारी चांगली घटना घडेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे होतील. पूर्वी केलेल्या कामांचे श्रेय आर्थिक स्वरूपात मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. वरिष्ठ व सहकारी मदत करतील. जादा सवलती व भत्ते मिळतील. गृहसौख्याचा आनंद उपभोगाल.
शुभ दिनांक : 30, 31, 4, 5.

वृषभ: रेंगाळलेली कामे होतील
कामाचे वेळी काम इतर वेळी आराम असा पवित्रा राहील. व्यवसायात रेंगाळेली कामे मार्गी लावाल. जुनी येणी वसुल होतील. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल. महत्त्वाची कामे स्वत: करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. नोकरदार महिलांना सुसंधी मिळेल.शुभ दिनांक : 30, 31, 1, 2, 3.

मिथुन: जोडधंद्यातून लाभ
व्यवसायात प्रगतीचा आलेख चढता राहील. आर्थिक स्थितीही समाधानकारक राहील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. बदल करून कामाचा विस्तार वाढवाल. नोकरीत महत्त्वाचे करारमदार होतील. वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
शुभ दिनांक : 30, 31, 1, 2, 3, 4,5

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्क: महत्त्वाचे निर्णय घ्यावे
भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्याल. व्यवसायात व्यवहारी दृष्टीकोन ठेवून कामे मार्गी लावाल. कामात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. पैशाची तजवीज हितचिंतकांच्या मदतीने होईल. नोकरीत तुमच्या वागण्या बोलण्याने इतरांचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. कामातील बेत गुप्त ठेवा. नोकरदार महिलांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे.
शुभ दिनांक : 1, 2, 3, 4, 5

सिंह: कमी श्रमात यश
नशिबांची साथ राहील. व्यवसायात मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. नवीन कामे मिळतील. अर्धवट कामे गती घेतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. महिलांना मनाप्रमाणे खर्च करता येईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे योगही येतील सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान. आरोग्य चांगले राहील.
शुभ दिनांक : 30, 31, 4, 5

कन्या: आर्थिक बाजू चांगली
मानमरातब व प्रतिष्ठा मिळेल. सामाजिक कामात विशेष सहभागी व्हाल. व्यवसायात माणसांची पारख खुबीने करून कामात उपयोग करून घ्याल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी लवचिक धोरण अवलंबाल. नोकरीत कोणाकडून कुठलीही अपेक्षा करू नका. महिलांनी “”दिसते तसे नसते” हे लक्षात ठेवावे. समाधानी राहून वेळेचा सदुपयोग करावा.
शुभ दिनांक : 1, 2, 3

तूळ: विशेष लाभ होईल
व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कामात आवश्‍यक ते बदल कराल. तुमची महत्त्वाकांक्षा जागृत झाल्याने हातून निसटलेली संधी पुन्हा मिळवाल. गैरसमज झाले असल्यास सामोपचाराने मिटवाल. नवीन ओळखी होतील. सर्वांशी सलोख्याचे संबंध राहतील कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
शुभ दिनांक : 30, 31, 4, 5

वृश्चिक: सवलत मिळेल
तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा प्रत्यक्षात साकार होतील. अनपेक्षित कामे मार्गी लागतील. व्यवसायात कामाला हुरुप येईल. पैशाची चिंता मिटेल. ओळखीचा उपयोग होईल. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड होईल. बदलीच्या प्रयत्नांना यश मिळेल. आवडते छंद जोपासता येतील. नोकरदार महिलांचा प्रवास घडेल, पण त्यामुळे ताजेतवाने वाटेल.
शुभ दिनांक : 30, 31, 1, 2, 3

धनु: बेकारांना नोकरी
तुमच्यातील धाडसी वृत्ती जागृत होईल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. कामात सक्रिय पुढाकार राहील. अर्धवट कामे मार्गी लावाल. नवीन कामे हाती घ्याल. कामाचा वेग वाढेल. नोकरीत वरिष्ठांना व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. कामात मात्र गुप्तता राखा. कुवत ओळखून कामे स्वीकारा. विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवावी. यश हमखास मिळेल.
शुभ दिनांक : 30, 31, 1, 2, 3, 4,5

मकर: धोरण लाभदायी ठरेल
जमा खर्चाचे बजेट कोलमडेल. अनपेक्षित खर्च वाढतील. व्यवसायात कामात विस्तार करण्याचे बेत ठरतील. खेळत्या भांडवलाची तरतूद बॅंका व इतर संस्थांमार्फत होईल. आज रोख व उद्याही रोखच हे धोरण विशेष लाभदायी ठरेल. नोकरीत वरिष्ठांचा मूड पाहून तुमच्या मागण्या मांडाल. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. जुन्या वादाच्या प्रश्‍नांना तोंड द्यावे लागेल.
शुभ दिनांक : 30,31, 1, 2, 3, 4,5

कुंभ: कामाचा वेग वाढेल
कामात झालेली मरगळ झटकून मोठ्या उत्साहाने कामाला लागाल. नवीन कामे मिळतील. कामाचा वेग वाढल्याने आवश्‍यक ते बदल कराल. तुमची चिकाटी कामात दिसून येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बदलीसाठी सुसंधी चालून येईल. महिलांना अंगी असलेले कलागुण दाखवता येतील. मनाप्रमाणे कामे झाल्याने आनंद मिळेल. प्रवास घडेल.
शुभ दिनांक : 30, 31, 1, 2, 3, 4,5

मीन: आनंद द्विगुणीत होईल
अनुकूल घटनांची नांदी होईल. यश नजरेच्या टप्प्यात आल्याने आनंद द्विगुणीत होईल. व्यवसायात उलाढाल वाढेल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे मिळतील. नोकरीत कामाचा आनंद मिळेल. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. महिलांचा घर सजावट व दुरुस्ती यात बराच वेळ जाईल.
शुभ दिनांक : 1, 2, 3, 4, 5


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)