उत्सुकता भविष्याची: 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर 18 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल वक्री, कर्केत राहू , तुळेत शुक्र, वृश्‍चिकेत रवी, बुध वक्री, धनुमध्ये शनी व प्लुटो मकरेत केतू तर कुंभेत मंगळ व नेप्च्यून वक्री आहे. मनात जे ठरवाल ते पूर्ण कराल. त्यामुळे उत्साही व आनंदी रहाल. विनाकारण घाई, गडबड न करता कामाचे नियोजन योग्य करा. नवीन हितसंबंध निर्माण होतील. 


कामात काळजी घ्या 

“हाती घ्याल ते तडीस न्याल’या म्हणीचा अनुभव घ्याल. प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची घाई असेल. व्यवसायात रोखीचे व्यवहार करतांना दक्षता घ्या. कामात दुर्लक्ष होऊन चूक होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांना गृहीत धरून कामे करू नका. महत्त्वाचा निर्णय घेतांना श्रेष्ठांचा सल्ला घ्या. घरात कुवतीबाहेर खर्च करू नका.
विद्यार्थ्यांनी अभ्यासात चालढकल करू नये. तरूणांनी अति धाडस टाळावे.
शुभ दिनांक : 4,5,9 

नोकरीत उत्साह 

सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील त्यातून बरेच काही शिकताही येईल. व्यवसायात कामाचा वेग वाढेल. नोकरीत अति उत्साहाच्या भरात काम संपवण्याची घाई करू नका. आवश्‍यक तेथे वरिष्ठांचा सल्ला घ्या. पैशाची चिंता मिटेल. पगारवाढ व बढतीचे योग येतील. घरात मुलांच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे लागेल. नवीन खरेदीचे योग येतील. विद्यार्थ्यांनी धांदरटपणा करू नये. महिलांनी आवडता छंद जोपासावा.
शुभ दिनांक : 3,6,7,8 

वेळेचे नियोजन करा 

मनोकामना प्रत्यक्ष साकार करण्यास उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायात हातातील काम संपवून मगच नवीन कामांकडे वळा. आर्थिक दृष्टीकोन ठेऊन कामाचे विभाजन करा. कामाचे प्रमाण वाढल्यामुळे वेळेचे नियोजन करणे गरजेचे होईल. पैशाची चणचण कमी करण्यासाठी तात्पुर्ती तरतूद करावी लागेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करणे. मुलांकडून अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांनी योग्य व्यक्तींकडून शंका निरसन करावे.
शुभ दिनांक : 3,4,5,9 

संधी दृष्टीक्षेपात 

कामांची आखणी करून त्याप्रमाणे कामे पुढे न्याल. संघर्षातून खडतर वाटचाल राहील. हातातील पैशाचा विनियोग योग्य कामांसाठीच कराल. नवीन संधी दृष्टीक्षेपात येईल. नोकरीत कामात केलेला आळस अंगलट येण्याची शक्‍यता आहे. जर जादा कामाची तयारी दाखवलीत तर वरकमाई करता येईल. वैचारिक तणाव राहील. विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांना यश मिळेल. महिलांनी मनन-चिंतन करावे.
शुभ दिनांक : 3,4,5,6,7,8.

विसंबून राहू नका 

“भरवशाच्या म्हशीला टोणगा’ या म्हणीचा प्रत्यय येईल. आपल्याच माणसांकडून तोंडघशी पडण्याची वेळ येईल. तरी सावध रहा. सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा. नोकरीत स्वतःचे काम संपवून सहकाऱ्यांनाही मदत करावी लागेल. अपेक्षा न ठेवता कृती केलीत तर त्याचे समाधान मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात किरकोळ वाद होतील.तरी डोके शांत ठेवा. कर्तृत्वाला चुकू नका.
शुभ दिनांक : 3,4,5,6,7,8,9.

प्रकृती सांभाळा 

योग्य व्यक्तींची मदत घेऊन कामे सोपवलीत तर कामाचा तणाव कमी होईल. प्रकृतीचे तंत्रही सांभाळलेत तर जास्त वेळ काम आनंदाने करू शकाल. व्यवसायात पैशाच्या कामांना प्राधान्य देऊन कामे पूर्ण करा. नोकरीत वरिष्टांचा विचार व सूचनांचे पालन तंतोतंत केलेत तर फायदा तुमचाच होईल. घरात गैरसमजुतीने होणारे वाद टाळा. विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करावे.
शुभ दिनांक : 3,4,5,6,7,8,9.

धोका पत्करू नका 

माणसांची पारख करून त्यांचेवर विश्‍वास ठेऊन कामे सोपवणे हे अवघड काम आहे असा अनुभव येईल. व्यवसायात कामाचे स्वरूप चांगले असेल, पैशाच्या हव्यासापोटी धोका पत्करू नका. तुमचे खरे हितचिंतकच तुमच्या मदतीला येतील. जादा कामासाठी वरिष्ठ तुमची खुशामत करतील. तरूणांना प्रेमात रुसवे-फुगवे सहन करावे लागतील. महिलांनी अध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष द्यावे.
शुभ दिनांक : 4,5,6,7,8,9. 

नवीन कामाची संधी 

अनपेक्षित शुभ घटना मनाला उभारी देतील. व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. नवीन कामाची संधी मिळेल. मात्र कामाच्या पूर्ततेसाठी जादा वेळ मागून घ्या. नोकरीत तुमच्या कामाचे महत्व वाढेल. कामात सहकारी मदत करतील. वरिष्ठ जादा अधिकार व सवलती देतील. घरात मुलांच्या अभ्यासाची चिंता वाटेल. तरूणांना मनपसंत जोडीदार भेटेल. अभ्यासाचा अति ताण घेऊ नये.
शुभ दिनांक : 3,6,7,8,9. 

कामात चोख रहा 

वेगळी वाट पत्करून काहीतरी वेगळे करण्याची खुमखुमी येईल. मात्र “अति तेथे माती’ ही म्हण लक्षात ठेवा. व्यवसायात नियोजनपूर्वक काम केलेत तर फायदा होईल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. विश्‍वसार्हता पडताळून नवीन नवीन व्यक्तींवर जबाबदारी सोपवा. नोकरीत चौकस राहून कामात चोख रहा. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. घरात अविचाराने कृती करू नका.
शुभ दिनांक : 3,4,5,9 

पैशाची तजवीज होईल 

महत्वाचे निर्णय घेतांना सभोवतालच्या व्यक्तींकडून नवीन अनुभव येतील. थोडेसे गोंधळात टाकणारे ग्रहमान आहे. व्यवसायात पैशाचे व वेळेचे गणित असून त्याप्रमाणे कामाची आखणी करा. पैशाची तजवीज होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. स्वतःला झेपेल तेवढेच काम करून महत्व पटवून
द्याल. अति उत्साहाच्यापोटी कोणतेही आश्‍वासन देऊ नका.
शुभ दिनांक : 3,4,5,6,7,8. 

सबुरी ठेवा 

भौतिक व्यवहार जपतांना थोडी तारेवरची कसरत होईल. मनाविरूद्ध गोष्टी घडल्याने थोडी चिडचिड होईल पण सबुरी ठेवलीत तर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात हातातील कामे वेळेत संपवण्याचा प्रयत्न राहील. नियमांचे काटेकोरपणे पालन करून उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. घरात मोठ्या व्यक्तींचे विचार पटणार नाहीत. विद्यार्थ्यांनी धांदरटपणा करू नये.
शुभ दिनांक : 4,5,6,7,8,9 

व्यवहारात चोख रहा 

चंचल स्वभावामुळे हातून बारीक गोष्टी राहून जातात. त्यामुळे नंतर त्याचा त्रास होतो तेव्हा सजगवृत्ती बाळगा व्यवसायात ठरवलेली कामे पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. पैशाचे व्यवहारात चोख रहा. उधार उसनवार शक्‍यतो टाळा. सहकारी वरिष्ठांचा विश्‍वास संपादन करून कामे सोपवा. घरात स्वतःचे स्वास्थ्य सांभाळून कामे करावीत. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.

शुभ दिनांक : 3,6,7,8,9. 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)