उत्सुकता भविष्याची… (6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 18 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे)

अनिता केळकर

मेषेत हर्षल वक्री, कर्केत रवी,राहू व बुध वक्री, कन्येत शुक्र, तुळेत गुरू, धनुमध्ये शनि व प्लुटो दोन्ही वक्री, मकरेत मंगळ वक्री केतू तर कुंभेत नेप्च्यून वक्री आहे. तडजोडीचे धोरण स्वीकारले तर तुमचाच लाभ होईल. नवीन कामे मिळाल्याने व्याप वाढेल. आर्थिक उन्नती होईल. नवीन ओळखी होतील. आरोग्य ठीक राहील.

मेष: दगदग, धावपळ होईल
रवी, बुध, गुरू, मंगळ यासारखे महत्वाचे ग्रह साथ देणारे आहेत. तेव्हा आवश्‍यक ते फेरबदल व्यवसायात व दृष्टीकोनात करा. कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे दग-दग, धावपळ करावी लागेल. आर्थिक स्थितीही समाधानकारक राहील. नोकरीत हातातील कामे वेळेत पूर्ण कराल व सहकारी व वरिष्ठांनाही आवश्‍यक असल्यास मदत कराल.
शुभ दिनांक : 6,7,8,9,10,11,12

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वृषभ: आत्मविश्‍वास वाढेल
व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. खेळत्या भांडवलाची सोयही हितचिंतकांची मदत होऊन होईल. नोकरीत महत्वाचे पत्र व्यवहार होतील. इतरांशी चांगले हितसंबंध ठेवाल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. खर्चाचे प्रश्‍न सुटतील. महिलांना आप्तेष्ट व मित्र मंडळीच्या भेटीचे योग येतील.
शुभ दिनांक : 6,7,8,9,10,11,12

मिथुन: स्वप्ने साकार होतील
“आधी केले मग सांगितले’ असे धोरण ठेवा. व्यवसायात रेंगाळलेली कामे हातावेगळी करा. मगच नवीन कामे हाती घ्या. नवीन कामामुळे तुमचा हुरूप वाढेल. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. वरिष्ठ अधिकार व भत्ते देतील. त्याचा उपयोग करून घ्या. मात्र इतरांकडून कमीत-कमी अपेक्षा बाळगावी म्हणजे भ्रमनिरास होणार नाही.
शुभ दिनांक : 8,9,10,11,12

कर्क: कामाला गती मिळेल
“इच्छा तिथे मार्ग’ असे उद्दिष्ट ठेवाल. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. आर्थिकमान सुधारेल. ओळखीचा उपयोग होऊन कामे गती घेतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत हट्टवादीपणा सोडा. कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. सहकारी व वरिष्ठांची मदत कामात होईल. महिलांना कामाचा उत्साह वाटेल. तरूणांना नवीन व्यक्तीं विषयीचे आकर्षण वाढेल.
शुभ दिनांक : 6,7,10,11,12

 

सिंह: कष्टाचे फळ मिळेल
व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामात मोठ्या व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल. अध्यात्मिक प्रगती होईल. हातून चांगली कामे घडतील. नोकरीत कष्टाप्रमाणे फळ मिळेल. वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. जादा कामातून वरकमाई करता येईल. विद्यार्थ्यांनाही अभ्यासात एकाग्रता मिळेल.
शुभ दिनांक : 6,7,10,11,12

कन्या: प्रवासाचे बेत
अनपेक्षित लाभ होतील. व्यवसायात तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा फलद्रुप होईल. कल्पकता दाखवून कामे करण्यावर भर राहील. नोकरीत कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवासाचे बेत ठरतील. महिलांना मनःस्वास्थ्य मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात धांदरटपणा टाळावा. तरूणांचे विवाह जमतील.
शुभ दिनांक : 6,7,8,9,10,11,12

तूळ: नवीन कामे मिळतील
आनंददायी घटना घडतील. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. व्यवसायात प्रगतिच्या नव्या वाटा दिसतील. कामात बदल करून विस्तार कराल. नवीन कामे मिळतील. नोकरीत मिळालेल्या संधीचा पूरेपूर उपयोग करून घ्याल. महिला, मुलांच्या प्रगती, प्रकृतीबाबतची चिंता मिटेल. गृह व्यवस्थापनात चांगले यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती उत्तम राहील.
शुभ दिनांक : 8,9,10,11,12

वृश्चिक: प्रयत्नांना यश मिळेल
“श्रद्धा व सबुरीचे’ धोरण ठेवा. व्यवसायात मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करून उलाढाल वाढवाल. वेळेचे व कामाचे गणित अचूक येईल. त्याचा महत्वाचे निर्णय घेतांना उपयोग होईल. नोकरीत मेहनत व कष्ट वाढतील केलेल्या प्रयत्नांना यश येईल. इतरांची शाबासकी मिळवाल. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाचा फायदा होईल.
शुभ दिनांक : 6,7,10,11,12

धनु: प्रयत्नशील रहा
व्यवसायात, नोकरीत सुधारणा. कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे दगदग, धावपळ बरीच होईल. महत्वकांक्षा जागृत होईल. त्यामुळे यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील रहाल. व्यवसायात कामाचा नवीन अनूभव येईल. नोकरीत कामाचे बाबतीत चोखंदळ रहा. कामात गुप्तता राखा. फुकटचे सल्ले टाळा. महिलांनी घरातील व्यक्तींकडून कुठलीही अपेक्षा ठेऊ नये.
शुभ दिनांक : 8,9,12

मकर: वेळ व पैसा खर्च होईल
“प्रयत्ने वाळूचे….’ ह्या म्हणीचा अनुभव येईल. सहज सोप्या वाटणाऱ्या कामांना विलंब होईल. नको त्या कामात बराच वेळ व पैसा खर्च होईल. व्यवसायात कामांना विलंब होईल. त्याचा परिणाम पैशाची थोडी चणचण भासेल. मोठ्यांच्या सल्ल्यांचा उपयोग महत्वाचे निर्णय घेतांना होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करावे.
शुभ दिनांक :6,7,10,11

कुंभ: प्रगतीचा आलेख उंचावेल
ग्रहमान वातारणाची साथ मिळेल. व्यवसायात प्रगतीचा आलेख उंचावत जाईल. मनाप्रमाणे कामे होतील, त्यामुळे समाधान मिळेल. परदेशगमनाची संधी चालून येईल. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आता मिळेल. महिलांना मनाजोगता खर्च करता येईल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.
शुभ दिनांक : 6,7,8,9,12

मीन: अनपेक्षित लाभ होतील
विचार व मनाची योग्य सांगड घातली गेल्याने यश फलद्रुप होईल. व्यवसायात चांगल्या घटना घडतील. अनपेक्षित लाभ होतील. वेळेचा उपयोग योग्य प्रकारे होईल. नोकरीत वरिष्ठ महत्वाची कामे तुमचेवर सोपवतील. त्यासाठी जादा सवलती व अधिकारही देतील. कलावंतांना प्रतिभेचे साथ मिळेल. विद्यार्थ्यांनी चिकाटी व जिद्दीने यशश्री खेचून आणावी.
शुभ दिनांक : 6,7,8,9,10,11


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)