उत्सुकता भविष्याची : 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 18 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल वक्री, कर्केत राहू , तुळेत शुक्र. वृश्‍चिकेत रवी, बुध वक्री, धनुमध्ये शनी व प्लुटो मकरेत केतू तर कुंभेत मंगळ व नेप्च्यून वक्री आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशस्वी वाटचाल कराल. योग्य व्यक्तींची योग्य वेळी मिळालेला सल्ला फायदेशीर ठरेल. परदेशगमनाची संधी येईल. आप्तेष्ठांच्या भेटीगाठीने मन आनंदी राहील. 


नवीन संधी : प्रगतीच्या दृष्टीने योग्य ती वाटचाल होईल. निर्णय अचूक ठरतील, मनातील बऱ्याच काळ रेंगाळत असलेली मनिषा पूर्ण होईल. नोकरीत अपेक्षित पत्रव्यवहार होतील. परदेश गमनाच्या कामांना चालना मिळेल. नवीन ओळखीतून आनंद मिळेल. नवी संधी चालून येईल. घरात वातावरण आनंदी राहील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. तरूणांना मनपसंत जोडीदार भेटेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता साधावी. 

शुभ दिनांक : 21,22,23,24,25 

व्यवहारी दृष्टिकोन ठेवा : स्वयंसिद्ध रहा. व्यवसायात अनपेक्षित मदत मिळाल्याने आश्‍चर्याचा धक्का बसेल, कामात व्यवहारी दृष्टिकोन राहील. वेळेचे महत्व पटेल. पैशाची तजवीज नव्याने खेळत्या भांडवलाची सोय होईल. नोकरीत भविष्यात लाभदायी ठरणारे काम कराल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. नवीन जबाबदारी पेलावी लागेल. गृहिणींना आवडत्या छंदात वेळ रमवता येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मित्रांवर विसंबून राहू नये. 
                                शुभ दिनांक : 19,20,23,24,25. 

कामाकडे लक्ष द्या : ग्रहांची मर्जी आहेच तेव्हा संधीचा लाभ घ्या. व्यवसायात नवीन योजना तुम्हाला आकर्षित करतील. खर्चाचा ताळेबंद केल्याखेरीज कोणतीही कृती करू नका. नोकरीत कामात बेत गुप्त ठेवा. हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा. कामामुळे प्रवासयोग. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात शब्द हे शस्त्र आहे. लक्षात ठेवावे. मने दुखवू नयेत. कलावंत खेळाडूंना त्यांचे क्षेत्रात चांगले यश मिळेल विद्यार्थ्यांनाही कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती होईल. 
                                शुभ दिनांक : 19,20,21,22,25. 

सहकार्य मिळेल: सभोवतालच्या व्यक्तींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यवसायात कामांना निश्‍चित दिशा मिळेल. आर्थिक स्थितीचा आलेख उंचावेल. नोकरीत कामात झालेला विलंब तुम्हाला सहन होणार नाही. नवीन नोकरीसाठी प्रयत्नात रहा. घरात मुलांच्या व इतर व्यक्तींच्या आवडीनुसार वागाल. जिभेचे चोचले पुरवावे लागतील. तरूणांना विवाहाचे वेध लागतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात टंगळमंगळ करू नये. 

शुभ दिनांक : 19,20, 21,22,23,24 

घरात मतभेदात समेट : कमी कामात जास्त यश मिळेल. ग्रहांची अनुकुलता राहील. व्यवसायात विरोधकांवर मात करण्यात यशस्वी व्हाल. कामाचा तणाव कमी होईल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे कराल. तुमचे महत्व सहकाऱ्यांना कळेल. घरात मतभेदात समेट होईल. पाहुण्यांची ये-जा राहील. प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मार्गदर्शनाचा लाभ होईल. 

शुभ दिनांक : 21,22,23,24,25. 

प्रगतीचा टप्पा गाठाल : कामांना गती मिळेल, त्यामुळे तुमचा हुरूप वाढेल. व्यवसायात तांत्रिक अडचणींमुळे लांबलेली कामेही गती घेतील. कामात बदल करून उलाढाल वाढवण्यात यशस्वी व्हाल. प्रगतीचा मोठा टप्पा गाठण्याची मनिषा राहील. नोकरीत केलेल्या कामाचा आनंद मिळेल. बेकारांना नवी नोकरी मिळेल. जोड धंद्यामधून फायदाही होईल. घरात शुभसमारंभ ठरतील. महत्वाचे निर्णय होतील. विद्यार्थ्यांनी प्रलोभनापासून दूर रहावे. 

शुभ दिनांक : 19,20,23,24,25. 

पैशाची चिंता मिटेल : ग्रहमानाची साथ मिळेल. व्यवसायात प्रगतीचा आलेख चढता राहील नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. पैशाची चिंता मिटेल. परदेश व्यवहारासंबंधी निर्णय निश्‍चित ठरतील. नोकरीत तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होईल. वरिष्ठ व सहकारी नवीन कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील. तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. विद्यार्थ्यांनी कष्टात कसूर करू नये. 

शुभ दिनांक : 21,22,25.


नवीन कामांना चालना : अडचणींवर यशस्वीपणे मात करून अपेक्षित यश मिळवाल. व्यवसायात नवीन कामांना चालना मिळेल. खेळत्या भांडवलाची सोय होईल. रेंगाळलेली कामे वेलेत पूर्ण होतील. काही महत्वाचे निर्णय घ्याल. एखादी अवघड वसुलीही होईल. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मांडा. मिळालेल्या संधीचा लाभ घ्या. घरात अनपेक्षित खर्च वाढतील. तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढेल. 

शुभ दिनांक : 19,20,23,24 

पैसे हातात खेळतील : योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा झाल्याने वेगाने कामाला लागाल. ध्येय धोरणे ठरवून मगच कृती कराल. कामाच्या प्रमाणात फायद्याचे प्रमाण असेल. चार पैसे हातात खेळतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. कामा निमित्ताने नवीन ओळखी होतील. नवीन खरेदीचे योग येतील. आनंदाची वार्ता मन प्रसन्न करेल. विद्यार्थ्यांनी लक्ष विचलित होऊ देऊ नये. 

शुभ दिनांक : 19,20, 21,22,25 

जिद्द व चिकाटीने यशस्वी : द्विधा मनस्थिती होईल तरी सबुरीने वागा. माणसांची पारख योग्य प्रकारे करा. व्यवसायात जिद्द व चिकाटी यांचे जोरावर कठीण परिस्थितीतून यशस्वीपणे पार पडाल. महत्वाची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर राहील. सतर्क राहून सभोवतालच्या व्यक्तिंच्या हालचालींवर लक्ष ठेवा. नोकरीत कोणत्याही आमिषाला बळी न पडता काम चोख करा. घरात मनाप्रमाणे कामे व्हावी हा अट्टहास नको. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कास सोडू नये. 

शुभ दिनांक : 19,20, 21,22,23,24. 

आर्थिक स्थिती सुधारेल : मानसिक स्वास्थ्य लाभेल. त्याचा फायदा सर्व स्तरांवर होईल. व्यवसायात जी कामे विनाकारण लांबली होती ती हाती घेऊन मार्गी लावाल. आर्थिक स्थिती सुधारेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत मानले तर समाधान मिळेल. मागण्यांसाठी अडून राहू नका. वादविवादाचे प्रसंग टाळा. घरात मतभेदात समेट होईल. माणसांची किंमत कळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात टंगळ-मंगळ करू नये. 

शुभ दिनांक : 19,20,21,22,24,25. 

व्यवहारी दृष्टिकोन ठेवा : दिलासा देणारे ग्रहमान आहे. व्यवसायात दिसते तसे नसते हे लक्षात ठेवावे. अति विश्‍वास टाळावा. व्यवहारी दृष्टीकोन ठेऊन निर्णय घ्यावेत. पैशाचे व्यवहारात चोख रहावे. नोकरीत मिळालेल्या अधिकारांचा वापर योग्य कारणासाठीच करावा. सहकारी व वरिष्ठांवर विसंबून राहू नये. घरात प्रश्‍नांची उकल होईल. काही ठोस बेत निश्‍चित होतील. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पद्धतीनेच अभ्यास करावा. 

शुभ दिनांक : 19,21,22,23,24,25 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
111 :thumbsup: Thumbs up
5 :heart: Love
3 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
5 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)