राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान !

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान प्रदान करण्यात आले. जम्मु-काश्‍मीरातील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ठार झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) हेड कॉन्स्टेबल रविंद्र बबन धनवाडे यांना मरणोपंरात शौर्य चक्राने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांची आई आणि पत्नी यांनी स्वीकारला.

राष्ट्रीय राईफल्स 44 तुकडीचे महेश सप्रे यांनी 3 ऑगस्ट 2018 रोजी जम्मु आणि काश्‍मिरमध्ये एका गावात झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी दोन हात केले. यामध्ये एका दहशतवाद्याला जखमी, तर अन्यंना पळवून लावले त्यांच्या समयसुचकतेमुळे मोठी घटना टळली. त्यांच्या या अदम्य पराक्रमासाठी त्यांना आज शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.
लेफ्टनन जनरल शंशाक ताराकांत उपासणी यांना सैन्यातील साहसपुर्ण सेवेसाठी “अति विशिष्ट सेवा मेडल’ने गौरविण्यात आले. जम्मु आणि काश्‍मिर राईफल्सचे ब्रिगेडीयर संजीव लांघे यांना सैन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी “अति विशिष्ट सेवा मेडल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एयर कमांडर धनंजय वसंत खोत फ्लाईंग पायलट यांनी देश संरक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांनाही “अति विशिष्ट सेवा मेडल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठी भाषिक 3 सैन्य अधिका-यांचा गौरव

लेफ्टनन जनरल मनोज मुकुंद नरवणे, मेजर जनरल (निवृत्त) विजय ज्ञानदेव चौघुले आणि लेफ्टनन जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस यांना सैन्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल “परम विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले. यापुर्वी नरवणे यांना “अतिविशिष्ट सेवा मेडल’, “सेवा मेडल’, “विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आलेले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)