किंटो मोमाटाला पराभवाचा धक्का

हॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन स्पर्धा

कोवलून (हॉंगकॉंग) – जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या जपानच्या किंटो मोमाटाला हॉंग कॉंग ओपन स्पर्धेच्या उपान्त्यफेरीत पराभावाचा धक्का बसला आहे. त्याला क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या सन वान हो याने 18-21, 21-16 आणि 21-19 अश्‍या तीनसेटपर्यंत चाललेल्या संघर्षपूर्ण सामन्यात पराभूत केले.

पहिल्या सेटमध्ये मोमाटाने लौकिकास साजेसा खेळ करत प्रथम आघाडी घेतली. इंटर्वल मध्ये खेळ थांबायला तेव्हा त्याच्याकडे 12-11 अशी आघाडी हाती. त्यानंतर त्याने आपली आघाडी 17- 11 अशी वाढवली. परंतु, सन वान हो याने सलग सहा गुण मिळवत पाहल्या सेटमध्ये 17-17 अशी बरोबरी केली.

या बरोबरी नंतर आपल्या खेळात सुधारणा करत किंटो मोमाटाने पहिला सेट जिंकला. दुसर्या सेटमध्ये दक्षिण कोरियाच्या खेळाडूचा दबदबा राहिला. त्याने या सिटीमध्ये नेट जवळ सुरेख खेळ केला. त्याला नशिबाची देखील साथ मिळाली. त्याने मारलेले काही फटके नेटला लागून विरोधी खेळाडूच्या जागेत पडले. दुसरा सेट सन वान हो याने 21-16 असा सहज जिंकला.

तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये अधिकवेळा सन वान हो याने आपली आघाडी कायम ठेवली होती. परंतु, मोमाटा हा पिछाडीभरून काढण्यात सतत यशस्वी होत होता. त्याने पाच वेळा पिछाडी भरून काढली. मागील तीनही सामन्यात तिसऱ्या सेटमध्ये सामना जिंकणारा मोमाटा आज सामना जिंकण्यात यशस्वी झाला नाही. सन वान हो याने तिसरा सेट 21-19 असा जिंकत सामनाही आपल्या नावे केला. या विजयामुळे तो 2016 च्या कोरिया ओपन स्पर्धेनंतर प्रथमच अंतिमफेरीत पोहचला आहे.

गॅम्बलिंग स्कॅंडलमुले 12 महिने अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पासून दूर असलेला किन्टो मोमाटा आपल्या पुनरागमनानंतर खूपच जबरदस्त लईत होता. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्याने सार्वकालीन महान बॅडमिंटनपटू लिन डॅनयाला हरविले होते. परंतु, या स्पर्धेत त्याला मागील स्पर्धेप्रमाणे खेळ उंचवता येत नव्हता. या स्पर्धेतील त्याच्या सर्व सामन्यांचा निकाल हा निर्णायक सेटमध्ये लागला आहे. आजच्या पराभवामुळे त्याची विजयाची मालिका खंडीत झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)