राज्यमंत्री कांबळे यांच्या सोसायटीत घरफोडी

पुणे- सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या वानवडी येथील परमार पार्क सोसायटीतील सदनिकेस दोन सदनिका चोरट्यांनी फोडल्या. मात्र तिन्ही सदनिकांमध्ये चोरट्यांच्या हाती कोणताच ऐवज लागला नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कांबळे यांची वानवडी येथील परमार पार्कमधील एच-बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावर सदनिका आहे. ही सदनिका गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर बंद होती. चोरट्यांनी कटरच्या मदतीने सदनिकेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मात्र, त्यांच्या हाती काहीही ऐवज लागला नाही. यानंतर चोरट्यांनी कांबळे यांच्या शेजारील दोन सदनिकांमध्येदेखील हात साफ करण्याचा प्रयत्न केला.

-Ads-

शुक्रवारी दुपारी ही घटना येथे कामासाठी आलेल्या एका महिलेच्या निदर्शनास आली. तिने सोसायटीच्या वॉचमनला ही माहिती दिली. यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला दुपारी ही माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांना समजले, की चोरी झालेल्या तीन सदनिकांमधील एक सदनिका ही राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या मालकीची आहे. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी जातीने उपस्थित होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)