2022 पर्यंत सर्वांना हक्‍काचे घर – देवेंद्र फडणवीस

‘अटल बांधकाम कामगार आवास योजने’चा शुभारंभ

पुणे – राज्यातील 25 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करून सर्वांना 2022 पर्यंत हक्‍काचे घर देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

-Ads-

‘अटल बांधकाम कामगार आवास योजने’चा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय पाटील, आमदार बाळा भेगडे, बाबूराव पाचर्णे, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार मीना, रेराचे अध्यक्ष गौतमकुमार चटर्जी आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बांधकाम कामगार देश आणि राज्य निर्माण करण्यात आघाडीवर आहेत. मात्र, या कामगारांची आजपर्यंत दखल घेतली गेली नाही. आमचे सरकार बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असेल. अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या माध्यमातून कामगारांना हक्‍काचे घर देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. राज्य शासन पंचवीस लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करणार असून पाच वर्षांत सर्वांना घरे देण्यासाठी कटीबद्ध आहे. कामगारांच्या हितासाठी राज्यात साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या घरांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.

कामगारांना मध्यान्ह भोजन, आरोग्य आणि प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या मनोगतात कामगारांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रधान सचिव राजेशकुमार मिना यांनी प्रास्ताविक केले. कामगार आयुक्त राजीव जाधव यांनी आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)