गृहकर्ज ट्रान्सफर करा; पण… (भाग-१)

जर आपण गृहकर्ज ट्रान्सफर करण्याच्या तयारीत असाल तर एक एप्रिलपर्यंत वाट पाहणे फायद्याचे ठरू शकते. कारण पुढील महिन्यापासून गृह आणि मोटार कर्जावरील व्याजदरात बदल होणार आहे. हा बदल रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार असणार आहे. त्यानंतर गृहकर्जाच्या हप्त्यात चांगल्या प्रमाणात बचत होणार आहे. कदाचित आताच ट्रान्सफर करण्याचा फंडा महागात पडू शकतो. गृहकर्जाचा व्याजदर कमी करण्यामागे आरबीआयने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटची केलेली कपात हे महत्त्वाचे कारण. त्यानंतरही बॅंकांनी गृहकर्जाच्या व्याजदरात किरकोळ कपात केली. तज्ज्ञांच्या मते, गृहकर्ज स्थानांतरित करायचे असेल तर 50 बेसिस पॉइंटमध्ये कपात असणे गरजेचे असून तरच हा फंडा फायद्याचा ठरू शकतो. म्हणून आताच ट्रान्सफर करण्याची घाई न करता आणखी काही दिवस वाट पाहून बॅंका आणखी किती कपात करतात हे पाहणे संयुक्तिक ठरेल.

गृहकर्ज ट्रान्सफर करा; पण… (भाग-२)

व्याज व्यवस्थेत बदल होणार : तज्ज्ञांच्या मते, गृहकर्ज ट्रान्सफर करण्याची तयारी करणाऱ्या मंडळींनी येत्या 1 एप्रिलची वाट पाहणे इष्ट ठरणार आहे. आरबीआयच्या सूचनेनुसार वेगवेगळ्या श्रेणीतील फ्लोटिंग व्याजदर आता एक्‍सटर्नल बेंचमार्कशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे एक एप्रिल 2019 पासून गृह आणि मोटार कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याज व्यवस्थेत बदल होणार आहे. आरबीआयकडून रेपोरेटमध्ये कपात केल्यानंतर तातडीने व्याजदरात घसरण होईल. नवीन ग्राहकांना याचा लाभ तत्काळ मिळण्यास प्रारंभ होईल.

– महेश यादव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)