गृहकर्ज ट्रान्सफर करा; पण… (भाग-२)

गृहकर्ज ट्रान्सफर करा; पण… (भाग-१)

एनबीएफसी ग्राहकांना आताच लाभ नाही : पुढील महिन्यांपासून व्याजदर निश्‍चित करण्याच्या गणितात बदल होत असला तरी त्याचा फायदा लगेचच हाऊसिंग फायनान्स कंपन्या किंवा एनबीएफसी कंपन्याच्या ग्राहकांना होणार नाही. कारण आरबीआयची नवीन पॉलिसी बॅंकांसाठी आहे. या आधारे एनबीएफसीकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना स्वस्तात कर्जाचा लाभ मिळणार नाही. त्यांना बॅंकांच्या तुलनेत अधिक व्याजाचा भरणा करावा लागणार आहे. मात्र एनबीएफसी ग्राहकांसाठी ही एक संधी आहे. ते कमी व्याजदरावर बॅंकेकडे स्थानांतरित होऊ शकतात. बॅंकां या ग्राहकांच्या परतफेडीचे रेकॉर्ड पाहून कमी व्याजदरात कर्ज स्थानांतरित करण्याची ऑफर देऊ शकतात.

व्याजात घसरण झाल्यास दुहेरी लाभ
रिझर्व्ह बॅंकेची 5 एप्रिलला पतधोरण आढावा बैठक असून त्यात व्याज दरात कपात होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या कारणामुळे आरबीआयच्या मते, महागाई त्याच्या मीडियम टर्म टार्गेटच्या 4 टक्के कमीच आहे. त्याचा लाभ आरबीआय प्रदान करू शकते. परिणामी व्याजदरात आणखी 25 बेसिस पॉइंटची कपात केली जाऊ शकते. अशा स्थितीत होमलोन पुन्हा स्वस्त होऊ शकते.

– महेश यादव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)