कुटुंब पद्धतीनुसार घराची सजावट (भाग-१)

शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे घराचे नियोजन करताना प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करण्याची आज गरज आहे. आज अनेक कारणांमुळे एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. कुटुंब एकत्र पद्धतीचे असो की, दोघांचेच असो, घराच्या आकारानुसार घराची सजावट करता येणे शक्‍य आहे. त्यानुसारच प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि गरजांचा विचार होणे अनिवार्य आहे.

आज शहराच्या मध्यवस्तीमधील घराच्या किमती पाहता उपनगर आणि शहराच्या सीमेलगतच्या भागात घरं घ्यावं लागणार ही सत्यस्थिती आहे. प्रथम वास्तू, त्याची जागा त्याला अनुसरून नैसर्गिक गोष्टी अशा एका ना अनेक बाबींचा चिकित्सक अभ्यास करून घराची जागा निश्‍चित करणे अपेक्षित आहे. यातील सर्वच बाबी स्वतःशी निगडित नसल्या तरी घराची सजावट करताना मात्र भौतिक बाबींचा विचार नक्कीच करतो. त्याचबरोबर काही गोष्टी आपल्याशी आणि कुटुंबाशी संबंधित आहेत, त्यांचा विचार करणे नक्कीच महत्त्वाचे आहे.

कौटुंबिक पद्धत : सदनिका घेताना कुटुंबाचा आकार, सदस्यांचे आर्युमान लक्षात घ्यावे. घरात वयोवृद्ध व्यक्ती असतील तर पहिला मजला, नैसर्गिक प्रकाश आणि हवा यांचा विचार प्राधान्याने येतो. सदनिका घेतल्यानंतर कुटुंबातील प्रत्येकाची सोय होण्यासाठी त्या जागेची योग्य बांधणी करणे तेवढेच गरजेचे असते. कौटुंबिक पद्धत म्हटले की, एकत्र व विभक्त असे वर्गीकरण करता येईल.

एकत्र कुटुंब : अलीकडे एकत्र कुटुंब असले तरी प्रत्येकाच्या गरजा बदललेल्या आहेत. फ्लॅटमध्ये राहताना व उपलब्ध जागेत सगळ्यांच्या आवडीनिवडीनुसार गरजा भागविताना सजावटही योग्य पद्धती होणे महत्त्वाचेच आहे. कारण अशा पद्धतीत घरातील कोपरानकोपरा कसा वापरात येईल, याचा विचार करणे गरजेचे असते.

कुटुंब पद्धतीनुसार घराची सजावट (भाग-२)

कसे कराल इंटेरिअर
एकसूत्रीपणा व मोकळी जागा असली पाहिजे.
फर्निचरचा इम्पॅक्‍ट कमी होण्यासाठी काचांचा वापर करायला हवा.
फर्निचर करताना टोकदार कोपरे करणे टाळणे सर्वांच्या हिताचे असते.
घरात वावरताना कोणालाही त्रास होणार नाही, असे सुटसुटीत फर्निचर असावे.
नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्तीत जास्त राहील अशा पद्धतीने फर्निचर असावे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)