नवी दिल्ली – मुंबईतील झोपडीधारकांना पाचशे फुटांचे पक्के घर देण्याचे आश्वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी हे आश्वासन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की 1 मार्च रोजी मुंबईतील सभेत कॉंग्रेस नेत्यांनी मांडलेल्या झोपडीधारकांना पाचशे फुटांच्या घराच्या प्रस्तावाला मी पाठिंबा दिला होता. कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास या झोपडीधारकांना हक्काचे घर देण्याचे आश्वासन आपण देत आहोत असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे. मुंबईत उद्या मतदान होत असून तेथे झोपडीधारकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या या आश्वासनला खूप महत्व दिले जात आहे.