हॉलिवूडच्या सिनेमांचा रिमेक बॉलिवूडमध्ये फ्लॉप

हल्ली जुन्या गाण्यांचा रिमेक आणि त्यानंतर त्या रिमेकचे रिमिक्‍स व्हायचा ट्रेन्ड वाढला आहे. त्यापूर्वी हॉलिवूडमधील गाजलेल्या सिनेमांचा हिंदी रिमेक करायचा ट्रेन्डही आला होता. मात्र हे रिमेक केलेले बॉलिवूडपट हॉलिवूडमध्ये जसे गाजले तसे काही गाजले नाहीत. हा रिमेकचा प्रयोग दरवेळी यशस्वी होतोच, असे नाही. “स्लिपींग विथ द एनिमी’च्या कथेवरून 1995 च्या माधुरी दीक्षितचा “याराना’ केला होता. तर याच कथेच्या आसपास फिरणारा 1996 चा जुही चावलाचा “दरार’ही आला होता. पण “याराना’ आणि “दरार’ दोन्ही सिनेमे सपशेल आपटले होते.

ऑफ्री हेपबर्न आणि ग्रेगरी पेग यांचा 1953 मध्ये “रोमन हॉलिडे’ आला होता. त्याची अणि 1934 च्या “इट हॅपन्ड वन नाईट’ ची कथा राज कपूर आणि नर्गिसच्या “चोरी चोरी’शी खूपच मिळती जुळती होती. आमिर खान आणि पूजा भटच्या “दिल है के मानता नहीं’मध्ये हीच कथा पुन्हा रिपीट झाली.

पुनर्जन्म घेऊन बदला घेणाऱ्या ऋषी कपूरच्या “कर्ज’ची कथा हॉलिवूडच्या “रिएन्कार्नेशन ऑफ पीटरा प्राऊड’वर आधारलेली होती. फरक एवढाच की पुनर्जन्म घेणारा हिरोही मूळ सिनेमात मरतो. पण त्याच्या रिमेकमधील ऋषी कपूर बदला घेतोच. ऋषी कपूरचा”कर्ज’ हिट झाला, तर 2008 मध्ये हिमेश रेशमियां आणि उर्मिला मातोंडकरचा “कर्ज’मात्र फ्लॉप झाला.

गूढ खजिन्याच्या शोधावर आधारलेला 1969 च्या”मॅकनाईज्ड गोल्ड’वर अनेक सिनेमे बनले. त्यात बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा यांचा “जलजला’ आणि 1992 मध्ये जुही चावला, आमिर खानचा “दौलत की जंग’ बनले होते., पण दोन्ही बॉलिवूडपट अपयशी ठरले.

हॉलिवूडमधील “स्कूल ऑफ स्काउंड्रल्स’वर आधारित “छोटी सी बात’मध्ये अमोल पालेकर आणि अशोक कुमार यांचा लीड रोल होता. विल स्मिथच्या “द हिच’ची स्टोरीही याच्याशी खूपच मिळती जुळती होती. गोविंदा आणि सलमानचा 2007 मध्ये आलेला “पार्टनर’ ही असाच होता. पण जे यश आमोल पालेकर, अशोक कुमारच्या “छोटी सी बात’ला मिळाले, ते “पार्टनर’ला मिळाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)