हाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : ऑस्‍ट्रेलियाचा चीनवर 11-0 ने विजय

भुवनेश्वर – हाॅकी विश्वचषक स्पर्धेतील ब गटातील लढतीत ऑस्‍ट्रेलियाने चीनचा 11-0 ने धुव्वा उडवत मोठा विजय मिळवला. या स्पर्धेतील हा सर्वात विजय ठरला. याआधी स्पर्धेत नेदरलँडस् संघाने मलेशियाचा 7-0 असा पराभव करत मोठा विजय मिळवला होता. तर 2010 साली ऑस्‍ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 12-0 ने विजय मिळवला होता. हा विजय म्हणजे जागतिक विक्रम होता.

सामन्यात ऑस्‍ट्रेलियाने सात मैदानी गोल तर चार पेनल्टी काॅर्नरव्दारे गोल केले. ऑस्‍ट्रेलियाच्या ब्लैक गोवर्सने सामन्यात 10 मि.,19 मि आणि 34 व्या मिनिटाला गोल नोंदवत हॅट्रिक केली. तर टिम ब्रैंडने 2 गोल केले.याशिवाय ऑस्‍ट्रेलियाकडून एरान जालेस्‍की, टॉम क्रेग, जेज हेवर्ड, जैक वैटन, डेसन आणि फ्लिन ओगल्‍वीने प्रत्येकी एक एक गोल केले.

-Ads-

चीनला पराभवानंतरही क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्याची एक संधी आहे. कालच्या ब गटातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडवर विजय मिळवल्याने आता क्राॅसओवरमध्ये चीनचा सामना इंग्लंडशी होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)