आम्ही आमचा धडा शिकलो आहोत : रिझवान

कराची  – पाकिस्तान संघाने 2014 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपान्त्यफेरीच्या सामन्यातील विजयानंतर झालेल्या वादातून धडा शिकला आहे, असे पाकिस्तान हॉकी संघाचा कर्णधार महंमद रिझवान याने सांगितले. पाकिस्तानचा संघ 28 नोव्हेंबर पासून भारतात होणाऱ्या हॉकी विश्‍वचषकात सहभागी होणार आहे.

चार वर्षांपूर्वी भारतात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपान्त्यफेरीच्या सामन्यात पाकिस्तानने भारताला नमविले होता. त्यानंतर काही खेळाडूंनी खूप वेगळ्या प्रकारे जल्लोष केला. त्यातून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. शेवटी अंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने यात दाखल घेत 2 पाकिस्तानी खेळाडूंवर हॉकी खेळण्यांपासून बंदी घातली होती.

-Ads-

याबाबत पाकिस्तान सांघाचा कर्णधार म्हणाला, यावेळी आम्ही खेळावर जास्त लक्ष केंद्रित करणार असून सर्व सामन्यांना सारखेच महत्व देणार आहोत. विश्‍वचषकात चांगली कामगिरी करणे हेच आमचे ध्येय असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)