हाॅकी विस्वचषक स्पर्धा 2018 : ‘न्यूझीलंड-स्पेन’ लढत बरोबरीत

भुवनेश्वर – हाॅकी विश्वचषकातील अ गटातील दुसऱ्या लढतीत गुरूवारी न्यूझीलंड आणि स्पेन यांच्यातील लढत 2-2 अशी बरोबरीत सुटली. यामुळे स्पेनचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर न्यूझीलंड संघाने क्राॅसओव्हरमध्ये प्रवेश केला आहे.

स्पेनकडून 9 व्या मिनिटाला अलबर्ट बलट्रन आणि 27 व्या मिनिटाला अल्चारो इग्लेसिया यांनी गोल करत आघाडी घेतली होती. मात्र सामना संपण्यासाठी दहा मिनिटे असताना अवघ्या सहा मिनिटांच्या कालावधीत न्यूझीलंडने दोन गोल करत स्पेनशी बरोबरी साधली. न्यूझीलंडकडून 50 व्या मिनिटाला हेडन फिलिप्सने तर 56 व्या मिनिटाला केन रसेलने पेनल्टी काॅर्नरव्दारे गोल केला.

न्यूझीलंड आणि स्पेन यांच्यातील सामना 2-2 ने बरोबरीत सुटल्याने जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सला या सामन्यात जिंकणे गरजेचे होते. जिंकण्याच्या इराद्याने फ्रान्सचा संघ मैदानात उतरला होता आणि त्यांनी उलटफेर करत अर्जेंटिनावर विजय मिळविला.

स्पेनचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर फ्रान्स आणि न्यूझीलंड उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी क्राॅसओव्हरमध्ये खेळतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)