नवी दिल्ली – जागतिक स्तरावरच्या अनेक स्पर्धा रद्द होत असताना हॉकी इंडियाने मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हॉकी स्पर्धांबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. आता मात्र, त्यांनी येत्या जूनपर्यंतच्या काळात होत असलेल्या सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
टोकियो ऑलिम्पिक, आयपीएलसह अनेक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याने तसेच काही स्पर्धा पुढेही ढकलण्यात आल्या आहेत. त्यातच आता हॉकी इंडियानेही जूनपर्यंतच्या सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.करोनाचा धोका वाढत असल्याचे स्पष्ट झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केले. त्यामुळे देशात होत असलेल्या स्पर्धा तर रद्द झाल्या तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.