हॉकी प्रो-लीग मधून पाकिस्तान बाहेर

नवी दिल्ली  – आर्थिक अडचणीमुळे संकटात सापडलेल्या पाकिस्तान हॉकी संघाला आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने कडून आणखीन एक धक्का मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या हॉकी प्रो-लीग स्पर्धेमधून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला असून पाकिस्तान हॉकी संघटनेने अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघाविरुद्धचे पहिले 3 सामने खेळू शकणार नसल्याचे संघटनेला कळवले होते त्यानंतर त्यांच्यावर ही कार्यवाही करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानी हॉकी संघटनेने घेतलेला निर्णय चुकीचा होता, त्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर करण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता असे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी थेरी वेल यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)