राष्ट्रीय हॉकी स्पर्धा – ओडिशा, भारतीय खेळ प्राधिकरण उपान्त्यपुर्व फेरीत

औरंगाबाद – ओडिशा आणि भारतीय खेळ प्राधिकरण (साई) यांनी साखळी फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रतिस्पर्धी संघांना मात देत राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या उपान्त्यपुर्व फेरीत धडक मारली. तर अन्य एका लढतीमध्ये साई संघांनी देखील प्रतिस्पर्धी संघाला पराभुत करुन आगेकूच नोंदवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भारतीय खेळ प्राधिकरणच्या हॉकी मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ओडिशाने बिहार संघाला 2-0 च्या फरकाने पराभुत करत ड गटात दहा गुणांसह अव्व्ल स्थान मिळवले. यावेळी त्यांच्या सुशील धनवर (31 मि.) ने पेनल्टी कॉर्नरची संधी घेतली आणि गोल कमावला. त्यानंतर सुशांत टोपोने 45 व्या मिनीटांत गोल करत निर्णायक 2-0 ची आघाडी स्थापन करुन ओडिशाला विजय मिळवुन दिला.

त्यानंतर साईच्या संघाने स्टील प्लांट स्पोर्ट बोर्डला 4-2 च्या फरकाने नमवुन उपान्त्यपुर्व फेरीत जागा मिळवली. त्यांनी 9 गुणांसह गटात दुसरे स्थान मिळवले आणि आपले आव्हान कायम ठेवले. साईच्या मनिष यादवने 19 व्या मिनीटांत पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये रुपांतरीत केले. त्यापाठोपाठ मायकल टोप्नोने 28 व्या मिनीटांत गोल केला. साईच्याच रोहितने 30 व्या मिनीटात गोल करत पहिल्या सत्रात साईला 3-0 ने आघाडी मिळवुन दिली.

दुसऱ्या सत्रात नबीन कूंजीर ने 37 आणि 47 व्या मिनीटांतच दोन गोल करुन सामन्यात रंग भरला. साईची आघाडी कापण्याच्या प्रयत्नात हा सामना स्टील प्लांट स्पोर्ट बोर्डला 3-2 च्या गुणसंख्येपर्यंतच नेता आला. साईच्या रोहितने 3-2 ची आघाडी 50 व्या मिनीटांत गोल करुन निर्णायक आघाडी ही 4-2 वर नेली आणि सामना जिंकला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)