ओडिसा, मध्यप्रदेश संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

115 वी आगाखान हॉकी स्पर्धा : महाराष्ट्र हॉकी असोसिएशनतर्फे आयोजन

पुणे : महाराष्ट्र हॉकी संघटना आयोजित 115व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेत सेल ओडिसा आणि मध्य प्रदेश ऍकॅडमी संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ओडिसा संघाने चंडिगड संघावर, तर मध्य प्रदेश संघाने हरियाणा संघावर मात केली.

नेहरूनगर येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी झालेल्या लढतीत जे. पी. पटेलच्या हॅटट्रिकच्या जोरावर सेल ओडिसा संघाने चंडिगड संघावर 6-1 ने मात केली. यात लढतीच्या सहाव्या मिनिटाला पटेलने गोल करून ओडिसाला आघाडी मिळवून दिली.

मध्यंतरापर्यंत ओडिसाने 1-0 अशी आघाडी कायम राखली होती. यानंतर ओडिसाने आक्रमक चाली रचल्या. लढतीच्या 33 व्या आणि 43व्या मिनिटाला पटेलने गोल करून ओडिसाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर थॉमस किंगसन (44 मि.), ए. टोपो (48 मि.), पी. बी. लाक्रा (55 मि.) यांनी गोल करून ओडिशाची आघाडी 6-0ने वाढवली. लढतीच्या 56व्या मिनिटाला संदीपसिंगने चंडिगडकडून गोल केला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. ही लढत ओडिसाने 6-1 अशी जिंकून आगेकूच केली.

यानंतर दुसऱ्या लढतीत मध्य प्रदेश ऍकॅडमीने कर्नाल हरियाणा संघावर 6-3ने मात केली. मध्य प्रदेश संघाकडून आदर्शसिंहने (4, 56 मि.) दोन गोल केले, तर हैदर अली (11 मि.), अब्दुल मझीद (13 मि.), गौरवसिंह (51 मि.), इनगुंबा (58 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. हरियाणा संघाकडून रवीसिंगने (50, 53 मि.) दोन गोल केले, तर अमित शर्माने 59 मि.) एक गोल केला.

मुलींच्या गटात पुण्याचा पराभव

मुलींच्या गटातील उपांत्य फेरीतील लढतीत नागपूर संघाने पुणे संघाचा 11-0 असा पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. यात नागपूरकडून वैभवीने (21, 38, 40 मि.) हॅटट्रिक नोंदवली, तर अंशुप्रिया (1, 2 मि.), नूतन सेनगल (37, 38 मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदविले. काजल लाक्रा (3 मि.), साक्षी प्रिया (23 मि.), रजनी (31 मि.), वैशाली भगत (33 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

निकाल : खुला गट : पुरुष : उप-उपांत्यपूर्व फेरी – 1) सेल ओडिसा – 6 (जे. पी. पटेल 6, 33, 43 मि.; थॉमस किंगसन 44 मि.; ए. टोपो 48 मि.; पी. बी. लाक्रा 55 मि.) वि. वि. चंडिगड – 1 (संदीपसिंग 56 मि.).
2) मध्य प्रदेश ऍकॅडमी – 6 (आदर्शसिंह 4, 56 मि., हैदर अली 11 मि., अब्दुल मझीद 13 मि., गौरवसिंह 51 मि., इनगुंबा 58 मि.) वि. वि. कर्नाल हरियाणा – 3 (रवीसिंग 50, 53 मि., अमित शर्मा 59 मि.)

महिला : उपांत्य फेरी – नागपूर – 11 (वैभवी 21, 38, 40 मि., अंशुप्रिया 1, 2 मि., नूतन सेनेगल 37, 38 मि., काजल लाक्रा 3 मि., साक्षी प्रिया 23 मि., रजनी 31 मि., वैशाली भगत 33 मि.) वि. वि. पुणे – 0.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)