काश्‍मीरमध्ये हिज्बुलचे दोन दहशतवादी ठार 

File photo

श्रीनगर – दक्षिण काश्‍मीरमध्ये मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. ते हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे सदस्य होते. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्कर सोडून दहशतवादाचा मार्ग पत्करणाऱ्याचाही समावेश आहे.

शोपियॉं जिल्ह्यातील झैनपोरा भागात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेतली. ही मोहीम सुरू असताना संबंधित भागात दडलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये मोहम्मद इद्रीस सुलतान उर्फ छोटा अब्रार आणि आमीर हुसेन उर्फ अबू सोब्बान हे दहशतवादी ठार झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय लष्करात असणारा सुलतान चालू वर्षी एप्रिलमध्ये हिज्बुलमध्ये सामील झाला. त्यानंतर झालेल्या काही दहशतवादी हल्ल्यांत सुलतान आणि आमीर सामील होते. त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. चकमकीत झालेला त्यांचा खातमा सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. मागील काही दिवसांत अनेक दहशतवाद्यांना ठार करून सुरक्षा दलांनी त्यांच्या संघटनांचे कंबरडे मोडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)