नॉयडात आपल्याच अधिकाऱ्याला पकडायला गेलेल्या सीबीआय टीमला मारहाण

नॉयडा (उत्तर प्रदेश): आपल्याच लाचखोर अधिकाऱ्याला पकडायला गेलेल्या सीबीआय टीमला मारहाण करण्यात आली आहे. लाचखोर सीबीआय सहायक इन्स्पेक्‍टर सुनील दत्त याला अटक करण्यासाठी एक इन्स्पेक्‍टर, एक सहायक इन्स्पेक्‍टर आणि एक महिला कॉन्स्टेबलची टीम सोनपुरा येथील त्याच्या घरी गेली होती. सुनीलच्या नातेवाईकांनी सीबीआय टीमला घरात घेऊन लाथाबुक्‍क्‍यांनी, लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली, त्यांचे मोबाईल आणि आयकार्डस जाळून टाकल्याचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण), विनीत जायस्वाल यांनी सांगितले आहे.

इकोटेक-3 ठाण्याच्या पोलीसांनी नंतर सुनीलचा भाऊ युद्धवीर सिंहसह त्याच्या काही नातेवाईकांना अटक केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यात अडथळे आणणे, त्यांना मारहाण करणे, बंधक बनवणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे ठाणे अधिकारी अनीता चौहान यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2014 साली वायईईआयडीए (यमुना एक्‍स्प्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरण) मध्ये 126 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयचे दोन अधिकारी इस्न्पेक्‍टर व्ही एस राठोड आणि सहायक इन्स्पेक्‍टर सुनील दत्त यांनी 20 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. व्ही एस राठोड यांना अटक करण्यात आली आहे, तर फरारी सुनील दत्त यांना अटक करायला गेलेल्या सीबीआय टीमला मारहाण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)