यंदा वर्षभरात 83 लग्नतिथी : गुरुअस्तामुळे मुहूर्त लांबणीवर
-गणेश घाडगे
नेवासे – तुळशी विवाह लागताच वधू-वरांच्या नातेवाईकांच्या लगीनघाईला सुरवात होते. यंदा 12 डिसेंबरपासून विवाह मुहूर्त सुरू होत असून, जुलै 2019 पर्यंत सोहळे चालणार आहेत. म्हणजेच आठ महिन्यांच्या काळात 83 लग्नतिथी लग्नसोहळ्यकरता मिळणार आहेत.
लग्नाचा बार उडवण्यासाठी अनेक वधू-वरांचे नातेवाईक सज्ज झाले आहेत. सध्या मुला-मुलींच्या सोयरिकी जुळविण्यासाठी पालकांची व त्यांच्या नातेवाईकांची लगबग सुरू आहे. मानपान, आहेर, मंगलकार्यालय, पत्रिका, आचारी, वाहनांची बुकिंगही सुरू झाली आहे.
दरवर्षी तुळशी विवाहनंतर लग्नगमुहूर्त सुरू होतात. मात्र या वर्षी गुरुचा अस्त असल्याने यंदा कर्तव्य असलेल्यांना तुळशी विवाहनंतर तब्बल 22 दिवस मुहूर्ताची वाट पहावी लागणार आहे. मुहूर्तानुसार डिसेंबर महिन्यापासून लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. डिसेंबर मध्ये ज्यांनी विवाह निश्चित केले आहेत, त्यांच्याची लगबग सुरू झाली आहे. 5 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत गुरूचा अस्त आहे. त्यामुळे तुळशी विवाह नंतरतब्बल 23 दिवसांनंतर विवाह समारभांना सुरवात होणार आहे. 12 डिसेंबर 2018 ते 11 जुलै 2019 या कालावधीत विवाहाचे मुहूर्त 83 आहेत.
अशा आहेत तिथी :
डिसेंबर मुहूर्त (9 मुहूर्त) 12 13 17 18 22 26 28 31
जानेवारी (9 मुहूर्त) 2 18 19 23 25 26 27 28 29
फेब्रुवारी (11 मुहूर्त) 1 8 9 10 11 15 19 21 22 24 26
मार्च (मुहूर्त 14 ) 2 3 8 9 10 13 14 19 20 25 27 29 30 31
एप्रिल (मुहूर्त 10 ) 17 18 19 20 22 23 24 26 27 28
मे (मुहूर्त 13 ) 7 8 12 14 15 17 19 21 22 26 29 30 31
जून (मुहूर्त 15 ) 6 9 10 12 13 14 15 16 17 18 19 20 25 26 28
जूलै (मुहूर्त 3 ) महिन्यात 6 10 व 11 तरखांचे मुहूर्त आहेत.
डिसेंबर महिन्यात लग्नतिथी सुरू होणार असल्याने बाजारपेठेत सध्या लग्नाच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीनंतर ओस पडलेली बाजारपेठ पुन्हा या लग्नसोहळ्यांमुळे गजबजण्याची चिन्हे आहेत. दुष्काळामुळे वधू-वरांकडील मंडळी खर्चासाठी हात आखडता घेण्याची शक्यता आहेत. मात्र थोड्याफार प्रमाणात का होईना खरेदी होणार असल्याने व्यापाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा