हिना खानने वाटली मिठाई

“कसौटी जिंदगी की 2’मधील कोमलिका अर्थात हिना खानने आपल्या सेटवर मिठाई वाटली आहे. हिना खानला अलिकडेच मिळालेल्या ऍवॉर्डच्या आनंदाप्रित्यर्थ तिने ही मिठाई वाटली. हिना खानला अलिकडेच “आयटीए ऍवॉर्डस 2019’मध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीच्या (ज्युरी आणि फॅन्स) पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तो आनंद साजरा करण्यासाठी हिना खानने सेटवर मिठाई वाटली. तिच्या या रोलमुळे या सिरीयलची प्रसिद्धी खूप झाली आहे.

मात्र या सिरीयलमध्ये तिच्या जागेवर दुसरी ऍक्‍ट्रेस येणार असे बोलले जायला लागले होते. कोमलिकाच्या रोलमध्ये हिना खानच्या जागेवर अलीशा पंवारची निवड झाल्याचे बोलले जाऊ लागले होते. स्वतः हिना खानने त्याबाबत सोशल मिडीयावरून एक स्पष्टिकरण दिले होते. या सिरीयलमधून 5-6 महिने ब्रेक घेऊन ती आपल्या सिनेमाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करणार आहे. मात्र ही सिरीयल आपण सोडणार नसल्याचेही तिने स्पष्ट केले.

केवळ काही दिवसांसाठी ब्रेक घेणार आहे एवढेच खरे आहे, असे तिने सांगितले. तिचा सिनेमा कोणता आहे आणि तो कधी रिलीज होणार आहे याबाबत मात्र तिने सविस्तर माहिती दिली नाही. आपल्या प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवायला तिला काही तरी निमित्त हवे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)