“हिमालयीन क्वीन’ रेल्वेच्या इंजीनने घेतला पेट

सिमला: हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला ते कालका दरम्यान धावणाऱ्या “हिमालयीन क्‍वीन’ या टॉय ट्रेनला आज दुपारी अचानक आग लागली. ही दुर्घटना सोलन जिल्ह्यातील कुमारहाटी आणि धर्मापूर दरम्यान घडली. यावेळी रेल्वेत सुमारे 200 प्रवासी प्रवास करत होते.

सिमल्याच्या दिशेने “हिमालयीन क्वीन’ दुपारी 2.15च्या सुमारास जात होती. धर्मापूरहून थोडे पुढे कुमारहट्टी येथे आल्यावर रेल्वेच्या इंजिनने अचानक पेट घेतला. इंजिनमधून अचानक धूर येत असल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि वेळेच मदतीसाठी स्थानिक धावल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. त्यानंतर नवे इंजिन जोडून ती ट्रेन सिमल्याला पोहोचली. दरम्यान, कालका ते शिमला हा मार्ग विश्व हेरिटेज म्हणून घोषीत करण्यात आला आहे. येथे अशाप्रकारची घटना घडल्यामुळे आश्‍चर्च व्यक्त केले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)