#आशियाई स्पर्धा : ४०० मी. शर्यतीत हिमा दासने पटकाविले रौप्यपदक

जकार्ता – इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत आज रविवारी सकाळी घोडेस्वारीमध्ये भारताने दोन रौप्यपदक पटकाविले. त्याचबरोबर बॅडमिटंनमध्ये सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांनी भारतासाठी दोन पदके निश्चित केली आहेत. त्यानंतर आता अॅथलेटिक्समध्ये भारताला मोठे यश प्राप्त झाले आहे.

अॅथलेटिक्समध्ये महिलांच्या ४०० मी धावण्याच्या शर्यतीत हिमा दास हिने रौप्यपदक पटकाविले आहे. हे भारताचे आठवे रौप्यपदक ठरले. हिमा हिने ४०० मीटर धावण्याचे अंतर ५०.७९ सेंकद वेळ नोंदवत पूर्ण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)