शिमला – हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यात आज पाऊस आणि गारपीट झालेली आहे. शुक्रवारी डोगंराळ भागात बर्फवृष्टी आणि मैदानी भागात पाऊस पडला. हमीरपुर, कांगड़ा, बिलासपुर, ऊना, मंडी, मनाली आणि चंबा या भागात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस पडला आहे. जोरदार वाऱ्यांमुळे दिवसाच सगळीकडे अंधार पसरल्याचे दृश्य हिमाचल प्रदेशात आज दिसून आले. तर रोहतांग आणि धौलाधारमध्ये शुक्रावरी बर्फवृष्टीच रिकाॅर्ड झालं.
राजधानी शिमलामध्ये दुपारी ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर एक वाजता पाऊस आणि गारपीट झाली. हमीरपूरमध्ये शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या पाऊस आणि वादळानंतर तापमानात घट झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. जोरदार पावसाने वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला असून शनिवारी हिमाचल प्रदेशातील काही भागात पाऊस, गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Himachal Pradesh: Rain and hailstorm hit Shimla. pic.twitter.com/nDLNPJxc5M
— ANI (@ANI) May 17, 2019