हिमाचल प्रदेश : काँग्रेसतर्फे भाजप सरकारची वर्षपूर्ती “निकम्मा दिन’ म्हणून साजरा  

शिमला : काँग्रेसने आज हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या वर्षपूर्तीचा दिवस “निकम्मा दिवस’ म्हणून साजरा करत मुख्यमंत्री ठाकूर हे राज्यामध्ये हिंदुत्ववादी अजेंडा राबवत असल्याचे आरोपपत्र राज्यपाल कार्यालयाकडे सादर केले आहे.

तर दुसरीकडे भाजपमार्फत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये धर्मशाला येथे ‘जन आभार’ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसने तीन राज्यांमध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीवर जोरदार हल्ला चढविताना “काँग्रेस हे शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे.” असा आरोप केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिमाचल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुखविंदर सुखू यांनी हिमाचल प्रदेश भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविताना, “राज्यातील भाजप सरकारच्या एका वर्षाचे विश्लेषण करायचे झाल्यास, आश्वासनांच्या नावाने शंख, खराब प्रशासन आणि बिघडत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था असे करता येईल.” असे आरोप लावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)