हिमा दासचे एका महिन्यात पाचवे ‘सुवर्ण’

File pic

चेक प्रजासत्ताक – भारताच्या हिमा दासने शनिवारी आणखी एक सुवर्ण पदक आपल्या नावे केले आहे. हिमाने चेक प्रजासत्ताकमध्ये नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रांपीमध्ये महिलांच्या 400 मीटर स्पर्धेत पहिले स्थान पटकावले.

गेल्या 15 दिवसांत 200 मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणाऱ्या हिमाने 400 मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या शर्यतीत भारताच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. हिमाने 52.09 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. हिमाचे या महिन्यातील हे पाचवे सुवर्ण पदक ठरले. यापूर्वी तिने 2 जुलैला युरोपमध्ये, 7 जुलैला कुंटो ऍथलॅटिक्‍स स्पर्धेत, 13 जुलैला चेक प्रजासत्ताकमध्येच आणि 17 जुलैला टाबोर ग्रांपी या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे.

दुसऱ्यास्थानीही भारताचीच व्ही के विस्मया राहिली. ती हिमापेक्षा 53 सेकंद मागे राहिली. विस्मयाने 52.48 सेकंद वेळ नोंदवली. तिसऱ्या स्थानी सरिता गायकवाड राहिली. तिनेही 53.28 सेकंदाची वेळ नोंदवली.

हिमानेच आपल्या ट्‌विटर अकाऊंटवर एक छायाचित्र शेअर करत याची माहिती दिली. ‘आज (शनिवार) चेक प्रजासत्ताकमध्ये 400 मीटरमध्ये मी पहिल्या स्थानी राहत स्पर्धेचा शेवट केला, असे हिमाने आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

पुरुषांच्या 200 मीटर स्पर्धेत मोहम्मद अनसने 20.95 सेकंदाची वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले. तर पुरुषांच्याच 400 मीटरस्पर्धेत भारताच्याच नोह निर्मल टोमने 46.05 सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकले. पुरुषांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत भारताच्या एम पी जाबीरने 49.66 सेकंदात शर्यत पूर्ण करत सुवर्ण पदक पटकावले. जितिन पॉल 51.45 सेकंद वेळ नोंदवत दुसऱ्या स्थानी राहिला.

हिमाची सुवर्ण कामगिरी

2 जुलैला पोजनान ऍथलेटिक्‍स
ग्रां. प्री. स्पर्धेत 200 मी. 23.65 सेकंदासह शर्यतीत सुवर्ण.

7 जुलैला कुटनो ऍथलेटिक्‍स
मीट स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत 23.97 सेकंदासह सुवर्ण.

13 जुलै झेक प्रजासत्ताक
येथे क्‍लांदो ऍथलेटिक्‍स 200 मीटर शर्यतीत 23.43 सेकंदासह सुवर्ण.

18 जुलै, झेक प्रजासत्ताक
टबोर ऍथलेटिक्‍स मीट, 200 मीटर शर्यतीत 23.25 सेकंदांसह सुवर्ण.

20 जुलै झेक प्रजासत्ताक
नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. 400 मीटर शर्यतीत 52.09 सेकंदांसह सुवर्णपदक.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)