शेअर निर्देशांकांची आगेकूच थांबली 

व्याजदर वाढीमुळे बॅंका, वाहन कंपन्यांच्या शेअरची विक्री 
दोन महिन्यांत रिझर्व्ह बॅंकेने दोन वेळा व्याजदरात वाढ केली असली तरी त्याचा जास्त नकारात्मक परिणाम शेअरबाजार निर्देशांकांवर झाला नाही. कारण आगामी काळात महागाई 5 टक्‍क्‍यांच्या आत राहणार असल्यामुळे व्याजदर वाढ होणार नसल्याचे दिसून येते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात माफक विक्री केल्याचे दिसून आले. 
-विनाद नायर, संशोधन प्रमुख, जीओजी वित्तीय सेवा
 नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेने महागाईला रोखण्यासाठी प्राधान्यक्रम देऊन व्याजदरात पाव टक्‍क्‍यांनी वाढ केल्यामुळे व्याजदराशी संबंधीत कंपन्याच्या शेअरची बुधवारी विक्री झाल्यामुळे शेअरबाजार निर्देशांकांची सात दिवसापासून एकतर्फी सुरू असलेली विक्रमी घोडदौड थांबली. बॅंका वाहन आणि वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्याच्या शेअरची घसरण झाल्यामुळे शेअरबाजार निर्देशांकांत आज घट नोंदली गेली.
मंगळवारी सकाळी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये बरीच वाढ झाली होती. मात्र, पतधोरण जाहीर झाल्यानंतर विक्री वाढली आणि सेन्सेक्‍स 84 अंकानी म्हणजे 0.23 टक्‍क्‍यानी कमी होऊन 37521 अंकावर बंद झाला. गेल्या सात दिवसांत 1110 अंकानी वाढला होता. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 10 अंकानी म्हणजे 0.03 टक्‍क्‍यानी कमी होऊन 11346 अंकावर बंद झाला. मुंबई शेअरबाजाराचा स्मॉल कॅप 0.3 टक्‍क्‍यानी अंकानी तर मिड कॅप 0.2 टक्‍क्‍यानी कमी झाला.
गेल्या सात सत्रात ज्या प्रमाणात निर्देशांकात वाढ झाली त्या तुलनेत आज झालेली घसरण बरीच कमी आहे. बाजारात आणखी आशावाद कायम असल्याचे काही ब्रोकर्सनी सांगीतले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आता खरेदी करीत असल्याचे वातावरण बाजारात आहे. काल या गुंतवणूकदारांनी 572 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. गेल्या काही महिन्यापासून या गुंतवणूकदारांनी बरीच विक्री केली होती. मात्र काल देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 290 कोटी रुपयां0च्या शेअरची विक्री केली. वाहन क्षेत्राचा निर्देशांक 0.77 टक्‍क्‍यांनी तर बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांक 0.55 टक्‍क्‍यांनी कमी झाला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)