बीएमडब्ल्यूच्या वाहन विक्रीत वाढ 

नवी दिल्ली -जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांत बीएमडब्ल्यूच्या सर्व वाहनांच्या विक्रीत दुहेरी वाढ झाल्याचे कंपनीचे भारतातील अध्यक्ष विक्रम पवाह यांनी सांगितले. ते म्हणाले की, कंपनीच्या वाहन विक्रीत या काळात 11 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन ती 7915 इतकी झाली आहे.
आगामी काळातही बीएमडब्ल्यू, मोटोरॅड या वाहनांच्या विक्रीत अशीच वाढ होण्याची शक्‍यता आहे. मिनी या नव्या कारच्या विक्रीत 58 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या काळात कंपनीने मोठ्या क्षमतेच्या 1038 इतक्‍या मोटरसायकल विकल्या आहेत. या विक्रीच्या आकड्यावर समाधान व्यक्‍त करून पवाह यांनी सांगितले की, आमच्या वाहनांना भारतीय ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम्ही विस्तारीकरण चालू ठेवणार आहोत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)